धोका असेल तर कंट्रोल होते कार; ADAS ऐकलं असेल, पण आता समजून घ्या काय आहे टेक्नॉलॉजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 07:23 PM2023-02-28T19:23:14+5:302023-02-28T19:24:08+5:30

आता कार खरेदी करताना प्रत्येकजण सुरक्षिततेचा नक्कीच विचार करतो. लोक 6 एअरबॅग असलेल्या वाहनांना प्राधान्य देतात. यावेळी ADAS सेफ्टी फीचर्सना खूप मागणी आहे.

If there is danger the car is controlled You may have heard of ADAS but now understand what the technology is indian car market know details | धोका असेल तर कंट्रोल होते कार; ADAS ऐकलं असेल, पण आता समजून घ्या काय आहे टेक्नॉलॉजी

धोका असेल तर कंट्रोल होते कार; ADAS ऐकलं असेल, पण आता समजून घ्या काय आहे टेक्नॉलॉजी

googlenewsNext

आता कार खरेदी करताना प्रत्येकजण सुरक्षिततेचा नक्कीच विचार करतो. लोक 6 एअरबॅग असलेल्या वाहनांना प्राधान्य देतात. यावेळी ADAS सेफ्टी फीचर्सना खूप मागणी आहे. प्रत्येकजण या फीचरच्या शोधात आहे. पण, ADAS (Advanced Driver Assistance Systems) म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. होय, कारण आज आम्‍ही तुम्‍हाला रस्त्यावरील अपघातांपासून वाचवणार्‍या या फीचरबद्दल सांगणार आहोत, तर चला जाणून घेऊया की ADAS धोक्याच्‍या वेळी कसे काम करते आणि ब्रेक न लावता ते कार कसे नियंत्रित करते. जाणून घेऊया त्याचे फायदे आणि तोटे.

काय आहे एडीएएस?
Advanced Driver Assistance Systems ही एक यंत्रणा आहे जी तुम्हाला ऑटो कारचा अनुभव देते. ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम हे विशेष सेफ्टी फीचर आहे जे तुम्हाला सुरक्षित ठेवण्यात मदत करतात. समोरील वाहनापासून एकसमान अंतर राखण्यासाठी ही यंत्रणा वापरली जाते. आता खाली दिलेल्या ADAS वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.

फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग
ADAS वैशिष्ट्याचा वापर करण्यासाठी, टाटा मोटर्सने रेड डार्क हॅरियर आणि सफारी मॉडेल्सना फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग सेन्सर्ससह सुसज्ज केले आहे. सेन्सर वाहनाला त्याच्या सभोवतालचा परिसर शोधण्यात आणि काही धोका जाणवल्यास ऑटो कॉल करण्यास मदत करतात. फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग जेव्हा ड्रायव्हरला समोरच्या वाहनाशी टक्कर झाल्याचे समजते तेव्हा त्याला सतर्क करते. ते स्थानाचे मूल्यांकन करण्यासाठी दोघांमधील अंतर आणि त्यांच्या गतीची गणना करते.

रिअर कोलिजन वॉर्निंग
रिअर सेन्सर समोरून येणाऱ्या वाहनाचा शोध घेण्यासही मदत करतो. यामुळे इतरांना सावध करण्यासाठी वाहनाचे धोक्याचे दिवे सुरू होतात.

ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग
इमर्जन्सी ब्रेकिंग अलर्ट तेव्हा सुरू होते, जेव्हा सिस्टम चालताना समोरच्या कोणता प्रॉब्लेम डिटेक्ट करतो. समोर चालणारे वाहन किंवा पादचारी असू शकतात. जेव्हा असे होते तेव्हा ते सिस्टम ड्रायव्हरला ऑडिओ अलर्ट ट्रिगर करते. टक्कर टाळण्यासाठी वाहन पूर्णपणे थांबवण्यातही मदत होते.

ब्लाईंड स्पॉट डिटेक्शन
टाटा मोटर्सने हॅरियर आणि सफारी एसयूव्हीला ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन अलर्टसह सुसज्ज केले आहे. लेन बदलताना हे फीचर खूप उपयुक्त आहे. जेव्हा लेन स्विच होते तेव्हा हे फीचर ORVMS ला ऑडिओ अलर्टसह अलर्ट करते, ज्यामुळे ड्रायव्हरला दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनाची माहिती मिळते.

डोअर ओपन अलर्ट
दरवाजा उघडल्यानंतर येणाऱ्या ट्रॅफिकवर परिणाम होऊ शकतो अशा गोष्टींपासून वाचवण्यासाठी हा सेन्सर हॅरियर आणि सफारीत देण्यात आलाय. जर कोणी वाहनातून उतरण्याचा प्रयत्न करत असेल तर अलार्म वाजतो.

रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट
गर्दीच्या पार्किंगच्या ठिकाणी वाहन पार्क करण्याचा प्रयत्न करताना हे ADAS फीचर उपयोगी पडते. हे फीचर ड्रायव्हरला सतर्क करते. वाहनाचा रिअर कॅमेरा केवळ कारच्या मागे काय आहे हे ओळखू शकतो.

लेन डिपार्चर वॉर्निंग
हे फीचर मुख्यतः त्या रस्त्यांवर आणि महामार्गांवर कार्य करेल जेथे लेन मार्किंग स्पष्ट आहे. सिस्टीम वाहनाने वापरलेली लेन शोधते आणि कार त्याच्या लेनमधून बाजूला झाल्यास ड्रायव्हरला अलर्ट करेल.

लेन चेंज अलर्ट
हे फीचर लेन मार्किंगसह रस्त्यांवर देखील काम करेल. जेव्हा लेन बदलण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ही प्रणाली ड्रायव्हरला येणाऱ्या वाहनांना अलर्ट करेल.

हाय बिम असिस्ट
हायवेवर विशेषतः अंधार पडल्यानंतर एसयूव्ही धावण्यासाठी हे फीचर अतिशय उपयुक्त ठरेल. वाहनाला विरुद्ध दिशेने येणारे वाहन आढळल्यास, वाहन अन्य ड्रायव्हरसाठी आपोआप लो बीमवर स्विच करते. वाहन पुढे जात असताना ते परत हाय बीमवर जाते.

ट्रॅफिक साईन रेकग्नायझेशन
हे फीचर वेग मर्यादा यांसारखे रोड साईन वाचण्यास आणि ड्रायव्हरला सतर्क करण्यास मदत करते. वेग नियंत्रित करण्यासाठी, ड्रायव्हर सहजपणे डिस्प्लेवर वेग मर्यादा अलर्ट पाहू शकतो.

Web Title: If there is danger the car is controlled You may have heard of ADAS but now understand what the technology is indian car market know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन