टाटा पंचचा मालक व्हायचे असेल तर, किती असेल ईएमआय; 1 लाख डाऊनपेमेंट केले तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 01:07 PM2023-03-27T13:07:54+5:302023-03-27T13:08:17+5:30

खरेतर नव्या कार घेणे हे आपापल्या पगारानुसार, खर्चानुसार आणि वापरानुसार ठरवावे लागणार आहे. त्याचीही लिंक खाली दिलेली आहे.

If to own a Tata Punch, what will be the EMI after 1 lakh down payment, see calculation of new car | टाटा पंचचा मालक व्हायचे असेल तर, किती असेल ईएमआय; 1 लाख डाऊनपेमेंट केले तर...

टाटा पंचचा मालक व्हायचे असेल तर, किती असेल ईएमआय; 1 लाख डाऊनपेमेंट केले तर...

googlenewsNext

सध्या देशात एका छोट्या परंतू फाईव्ह स्टार रेटिंगवाल्या कारची हवा आहे. ती आहे टाटा पंच. टाटाच्या या कारमध्ये पंच नसला तरी लोक तिच्या मागे लागले आहेत. महिन्याला १०-१२ हजाराच्या संख्येने ही कार खपत आहे. ज्या लोकांना मारुती, ह्युंदाई नकोय त्या लोकांसाठी टाटाची पंच पर्याय ठरत आहे. असे असताना टाटा पंच घेण्यासाठी तुम्हाला किती कर्ज काढावे लागेल? किती हप्ता बसेल आणि किती डाऊनपेमेंट असेल हे पहावे लागणार आहे. 

Car Buying Guide for Salaried : तुमचा पगार किती? त्यानुसार कोणती कार घ्यायची, ते ठरवा... हिशेबाचा जबरदस्त फॉर्म्युला

खरेतर नव्या कार घेणे हे आपापल्या पगारानुसार, खर्चानुसार आणि वापरानुसार ठरवावे लागणार आहे. कारण आता महागाईने तुमच्या खिशातून सेव्हिंगचा पैसाही बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे जर हिशेब घातला नाही तर पुढे घात होण्याची शक्यता आहे. सध्या पेट्रोलच्या एन्ट्रीलेव्हल कारही पाच लाखाच्या पुढे येत आहेत. चला तर पाहुयात टाटाच्या पंचचा मालक होण्यासाठी किती पैसे भरावे लागतील...

टाटा पंच खरेदी करायची असेल तर तिची एक्स शोरुम किंमत पहावी लागणार आहे. पंचचे सर्वात स्वस्त मॉडेल Punch Pure आहे. तर सर्वात महागडे मॉडेल हे १० लाखांवर जाते. सर्वात स्वस्त पंचची किंमत सव्वा सहा लाख आहे. यामुळे आपण सर्वात कमी आणि तिसऱ्या सर्वात स्वस्त व्हेरिअंट Tata Punch Adventure ची किंमत पाहणार आहोत. 

पेट्रोल, डिझेल, सीएनजी की इलेक्ट्रीक? कोणती कार तुमच्यासाठी परफेक्ट...

टाटा पंच Pure, Adventure, Accomplished आणि Creative अशा चार ट्रिममध्ये ३० व्हेरिअंटमध्ये मिळते. एक्सशोरुम दिल्लीची किंमत ६ लाख ते ९.५४ लाख रुपये आहे. या मायक्रो एसयुव्हीला 1199 cc चे इंजिन आहे जे 20.09 kmpl पर्यंत मायलेज देते. 

चमत्कार! टियागो, अल्ट्रॉझ, नेक्स़ॉन; टाटाच्या गाड्यांचे मायलेज 2.5 किमी प्रति लीटरपर्यंत वाढले

पंच प्युअरची ऑन रोड प्राईज 6,62,599 रुपये आहे. एक लाख रुपये डाउनपेमेंट केले तर 5,62,599 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. ५ वर्षांसाठी ९ टक्क्यांप्रमाणे  11,679 रुपये ईएमआय बसेल. व्याजापोटी 1.40 लाख रुपये लागणार आहेत. 

एडव्हेंचर व्हेरिअंटची ऑन रोड किंमत 7,73,883 रुपये आहे. १ लाखाचे डाऊनपेमेंट केले तर 6,73,883 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. ५ वर्षांसाठी 13,989 ईएमआय बसेल. व्याजापोटी 1.65 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. 

Web Title: If to own a Tata Punch, what will be the EMI after 1 lakh down payment, see calculation of new car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.