कमी पगार पण ऑफिसमध्ये कारमधून रुबाबात जायचेय तर...; या आहेत परवडणाऱ्या कार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:27 IST2025-03-20T13:26:25+5:302025-03-20T13:27:08+5:30

आम्ही तुम्हाला तीन असे पर्याय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही कमी किंमतीची कार घेऊ शकता, तसेच ती चालविणे देखील तुम्हाला परवडणार आहे.

If you have a low salary but want to commute to the office by car...; These are the affordable cars... | कमी पगार पण ऑफिसमध्ये कारमधून रुबाबात जायचेय तर...; या आहेत परवडणाऱ्या कार...

कमी पगार पण ऑफिसमध्ये कारमधून रुबाबात जायचेय तर...; या आहेत परवडणाऱ्या कार...

सध्या दुचाकी काय की चारचाकी काय, किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. शिवाय त्यांना चालविण्यासाठी लागणारे इंधनही महागच आहे. अशावेळी घरातील महागाईला आवर घालता घालता लोकांना कारचे स्वप्न पूर्ण करणे जरा कठीणच वाटते. मग कारचे स्वप्न पूर्ण कधी करायचे. कशाला मोठी एसयुव्ही घ्यायची. जर पैसे, पगार कमी असेल तर तुम्ही छोट्या कार घेऊ शकताच की. 

आम्ही तुम्हाला तीन असे पर्याय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही कमी किंमतीची कार घेऊ शकता, तसेच ती चालविणे देखील तुम्हाला परवडणार आहे. कारण ती सीएनजीवर चालणारी असेल. ईलेक्ट्रीक गाड्या महाग आहेत. शिवाय कमी किंमतीच्या गाड्या तेवढची कमी रेंज, मग शहराबाहेर गेल्यावर जर चार्जिंग मिळाले नाही तर काय करायचे, यापेक्षा सीएनजी कार परडणाऱ्या आहेतच शिवाय सीएनजी जरी नाही मिळाला तरी तुम्ही पेट्रोलवर गरज भागवू शकता. 

ज्या लोकांना दिवसाचे उन्हातान्हातून किंवा थंडी वाऱ्याचे ३०-४० किमीचे अंतर पार करायचे आहे त्यांच्यासाठी सीएनजीचा चांगला पर्याय आहे. सीएनजी गाड्यांमध्ये मारुती, टाटा आणि ह्युंदाई या कंपन्या आहेत. 

मारुतीची अल्टो ही सहा-साडे सहा लाखाला मिळते. छोटी असल्याने ट्रॅफिकमध्येही चालविणे सोपे जाते. तसेच आताची सर्व फिचर्स जसे की पावर विंडो, एसी, पार्किंग सेन्सर, टचस्क्रीन आदी गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. सीएनजी मायलेजही खूप आहे. म्हणजे एक दीड किलोत तुम्ही दिवसाचे रनिंग करू शकता. 

दुसरा पर्याच याचा टियागोचा आहे. ही देखील छोटी कार आहे. 27 किलोमीटर/किलोग्राम चे मायलेज ही कार देते. म्हणजे एका टाकीत तुम्ही २०० किमीचे अंतर आरामात पार करू शकता. ही कार देखील सहा-सात लाखांत उपलब्ध आहे. जर तुम्ही एक लाख रुपये डाऊनपेमेंट केले तर तुम्हाला ही कार १०००० रुपयांच्या ईएमआयवर मिळू शकते. 

Maruti Suzuki Celerio CNG ही देखील एक छोटी कार आहे. जी सर्वाधिक सीएनजी मायलेजसाठी ओळखली जाते. 34.43 किमी/किलोग्राम एवढे जबरदस्त मायलेज आहे. ही कार साडे सहा लाखांना मिळते. या कारमध्ये पाच जण आरामात बसू शकतात. 

Web Title: If you have a low salary but want to commute to the office by car...; These are the affordable cars...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार