सरळ जाण्यासाठी प्रतिबंध असेल तर जाऊ नकाच ...'नो एन्ट्री'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:45 PM2017-09-18T12:45:00+5:302017-09-18T12:45:00+5:30

पथचिन्हे रस्त्यावरील नियमांना सर्वांनी समजून घ्यावे, यासाठी असतात. त्यामुळे नियमांच्या पालनाबरोबरच वाहन चालकांना वाहतूक कोंडीतून बाहेर जाण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी व नागरिकांना सुसह्यता मिळावी यासाठी उपयोग होत असतो.

If you have a restriction to go straight away, do not go ... No entry. | सरळ जाण्यासाठी प्रतिबंध असेल तर जाऊ नकाच ...'नो एन्ट्री'

सरळ जाण्यासाठी प्रतिबंध असेल तर जाऊ नकाच ...'नो एन्ट्री'

googlenewsNext

रस्ते वाहतूक आली म्हणजे कायदे, नियम या साऱ्या बाबी आल्या. त्या पाळायलाच पाहिजेत, किंबहुना नियमांचे पालन करणे हे प्रत्यक वाहनचालकाचे, पादचाऱ्यांचेही कर्तव्य आहे. आज दुर्दैवाने अनेक बाबतीत या साऱ्या नियमांचे पालन करण्यासाठी सांकेतिक चिन्हे असूनही लोकांकडून त्याचे पालन होत नाही. नियम व कायदेभंग करणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे समजले जाते, हीच मोठी प्रत्येक नियमभंग करणाऱ्या भारतीय नागरिकांची खूण बनली आहे. आपल्या देशाच्या व्यवस्थेने तयार केलेले नियम पाळण्यासाठी असतात, हे न समजल्याने, न समजून घेतल्याने आणि ते जाणीवपूर्वक न पाळल्याने अपघातासारख्या अनेक दुर्दैवी घटना घडतात. अनेक नव्याच कशाला जुन्या वाहनचालकांनाही रस्त्यावरच्या पथचिन्हांची माहिती नसते. झटकन उमजत नाही. अशा चिन्हांची ओळख थोडक्यात करून देतानाच त्याचे तोटे व फायदे आपण पाहू. या लेखामध्ये'नो एन्ट्री' या चिन्हा बाबत माहिती करून घेऊ. सोबत दिलेले नो एन्ट्रीचे चिन्ह अनेक ठिकाणी आपल्याला दिसत असते. तसे ते चिन्ह कळत नाही, असे म्हणायला खरे म्हणजे कोणताही वाव नाही. निरक्षर माणसालाही ते समजेल, असे हे चिन्ह आहे. मात्र ते चिन्ह असूनही अनेकजण अनेकदा या चिन्हाकडे दुर्लक्ष करतात. समोर च्या एखाद्या रस्त्यावर वा मार्गावर जाण्यास प्रवेश बंद असला तरी त्या ठिकाणी कार वा अन्य लहान वाहन घुसवले जाते. यामुळे अनेकदा समोरून त्या रस्त्यावर येणारी वाहने येत असतात, त्यांना अडथळा होतो, त्या रस्त्यावर जाणाऱ्या वा येणाऱ्या, क्रॉस करणाऱ्या पादचाऱ्यांना त्रास होतो, अपघात होतो.इतकेच काय जर अशा रस्त्यांमध्ये वाहतूक कोंडी झालेली असेल किंवा लोकांची गर्दी असेल तर मात्र अन्य व्यक्तींची व वाहनांची प्रचंड कुचंबणा होते. हे सारे टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन प्रत्येकाने करायला हवे. केवळ अपघात टाळणे इतकाच अशी चिन्हे तयार करण्याचा हेतू नाही. तर या चिन्हांमुळे नागरी नियमांचे पालन केले जावे, लोकांनी नागरिकांप्रमाणे वागावे, एका नागरिकाचा दुसऱ्यास त्रास न होता, उलट सहकार्याचा भाव प्रकट होईल, तेव्हा पथचिन्हे ही पाळण्यासाठी असतात. ती समजून घ्या. नो एन्ट्री असेल तर तेथे प्रवेश न करणे,हेच अभिप्रेत असते. इतके समजण्याइतकी सज्ञानता नक्कीच सर्वांकडे असायला हवी. कारण त्यामुळेच तर शहरी जीवन व वाहतुकीतील शिस्त, प्रणाली यशस्वीपणे चालू शकेल.

Web Title: If you have a restriction to go straight away, do not go ... No entry.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.