वाहनात किती पेट्रोल भरलं; आता मोबाइलवर येणार नोटिफिकेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 08:33 AM2019-11-21T08:33:52+5:302019-11-21T09:50:44+5:30

पेट्रोल पंपावर मापात पाप करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी अनोखं तंत्रज्ञान विकसित केलं आहे.

iit kanpur made fuel quantifier device it will now easy to catch petrol theft in pump? | वाहनात किती पेट्रोल भरलं; आता मोबाइलवर येणार नोटिफिकेशन

वाहनात किती पेट्रोल भरलं; आता मोबाइलवर येणार नोटिफिकेशन

Next

नवी दिल्लीः पेट्रोल पंपावर मापात पाप करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी अनोखं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. पंपावर गाडीत पेट्रोल भरल्यानंतर एक नोटिफिकेशन येणार आहे. हे नोटिफिकेश मोबाइलच्या माध्यमातून मिळणार असून, आपण गाडीत किती पेट्रोल भरलं ते अचूकरीत्या सांगणार आहे. आयआयटी विद्यार्थ्यांनी प्राध्यापक नचिकेत तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे  फ्यूल क्वांटिफायर डिवाइस तयार केलं आहे. 

त्यामुळे पेट्रोल पंपावर होणारी चोरी रोखता येणार असून, मापात पापही करता येणं कठीण होणार आहे. फ्यूल क्वांटिफायर डिवाइस हे कोणत्याही कार, मोटारसायकल, स्कूटर आणि स्कूटीमध्ये लावू शकतो. विशेष म्हणजे हे डिवाइस लावल्यानंतर वाहनात कोणताही बदल करण्याची आवश्यकता नसते. पेट्रोल टँकमध्ये हे डिवाइस बसवण्यात येणार आहे. ज्याच्या माध्यमातून गाडीच्या टाकीत किती पेट्रोल टाकण्यात आलं हे समजणार आहे. त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाइलवर येणार आहे.

वाहनचालक पेट्रोल पंपावर लावण्यात आलेलं मीटर आणि मोबाइलमध्ये असलेल्या डाटा पडताळूनही पाहू शकतो. हे डिवाइस ब्लू टुथच्या माध्यमातून कनेक्ट होणार आहे, त्यामुळे याचे नोटिफिकेश मोबाइलवर समजणार आहेत. माझ्या मार्गदर्शनात पीएचडी, एमटेकच्या विद्यार्थ्यांनी हे डिवाइस विकसित केलं आहे. हे डिवाइस बनवण्यासाठी जवळपास आठ महिन्यांचा वेळ लागला होता. या डिवाइसच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आलेला असून, मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच ते बाजारात उपलब्ध होणार आहे. तसेच या डिवाइसची किंमत जास्त नसणार आहे.   

Web Title: iit kanpur made fuel quantifier device it will now easy to catch petrol theft in pump?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.