इलेक्ट्रीक स्कूटरवरही मंदीचा प्रभाव; Ather Energy ने मॉडेलच बंद केले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 02:40 PM2019-09-18T14:40:46+5:302019-09-18T14:41:46+5:30

Ather Energy ने काही महिन्यांपूर्वीच या स्कूटर लाँच केल्या होत्या.

Impact of recession on electric scooters also; Ather Energy just shut down the model 340 | इलेक्ट्रीक स्कूटरवरही मंदीचा प्रभाव; Ather Energy ने मॉडेलच बंद केले

इलेक्ट्रीक स्कूटरवरही मंदीचा प्रभाव; Ather Energy ने मॉडेलच बंद केले

Next

भारतासह जगभरातील ऑटोमोबाईल सेक्टरवर मंदीचे ढग दाटले असून विक्री कमालीची घसरली आहे. मात्र, या मंदीचा प्रभाव केवळ पेट्रोल, डिझेल वाहनांवरच नसून इलेक्ट्रीक वाहनेही मंदीच्या विळख्यात आली आहेत. बेंगळुरूची कंपनी Ather Energy ने दोन स्कूटरपैकी एक मॉडेलच बंद केले आहे. 


Ather Energy ने काही महिन्यांपूर्वीच या स्कूटर लाँच केल्या होत्या. मात्र, या स्कूटरची मागणी घटल्याने कंपनीने मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्कूटर वेबसाईटवरूनही काढून टाकली आहे. कंपनीने सोशल मिडीया इन्टाग्रामवर याची माहिती दिली आहे. Ather 340 बंद करण्यामागे प्रमुख कारण कंपनीने मागणी कमी असल्याचे दिले आहे. तसेच 99 टक्के ग्राहकांची पसंती Ather 450 या स्कूटरला आहे. ही स्कूटर प्रिमिअम श्रेणीमध्ये येते. यामउले ड्रायव्हिंग रेंज, पॉवर आणि टॉप स्पीड यामध्ये फरक आहे. 


दोन्ही स्कूटर एकसारख्या दिसत असल्या तरीही त्यांच्यामध्ये बॅटरी बॅकअप आणि जादा पावरची मोटार हा मुख्यम फरक आहे. तसेच ज्या ग्राहकांनी अथर 340 प्री ऑर्डर नोंदविलेल्या आहेत त्यांनाही ही स्कूटर मिळणार नाही. कंपनीने तात्काळ प्रभावाने ही स्कूटर बंद केली आहे. हे ग्राहक अथर 450 साठी मागणी नोंदवू शकतात, असे कंपनीने सांगितले. 


अथर या कंपनीच्या स्कूटर केवळ दोन शहरांमध्येच मिळत होत्या. बेंगळुरूमध्ये या स्कूटरची किंमत 1.14 लाख रुपये आहे. तर चेन्नईमध्ये 1.22 लाख रुपये. अथर 340 च्या तुलनेच 450 ची किंमत 10 ते 12 हजारने जास्त आहे. 450 मध्.े 5.4 kW ची ताकद आणि 20.5 एनएमचा टॉर्क उत्पन्न करते. यामध्ये 2.4 kWh लिथिअम आयन बॅटरी देण्यात आली आहे जी इको मोडवर 60 किमी आणि नॉर्मल मोडवर 50 किमीची रेंज देते. 

Web Title: Impact of recession on electric scooters also; Ather Energy just shut down the model 340

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.