इंजिनातील तेल स्वच्छ करणारा महत्त्वाचा ऑइल फिल्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:43 PM2017-10-04T23:43:36+5:302017-10-04T23:44:10+5:30
इंजिनात असलेले तेल वंगणाची म्हणजे ल्युब्रिकेशनची प्रक्रिया पार पाडत असते, त्यामुळे मोटारीचे महत्त्वाचे असे इंजिन ऊर्जा तयार करून मोटार गतीमान करीत असते, वंगण तेल नीटपणे फिरत राहिले पाहिजे ते स्वच्छ असले पाहिजे हे ही त्याचप्रमाणे महत्त्वाचे असते. ते पाहाण्याची जबाबदारी या ऑइल फिल्टरची असते.
मोटारमध्ये विविध भागांमध्ये वंगण महत्त्वाचे असते आधीच्या लेखांमध्ये त्याचे महत्त्व सांगितले होते. दिले होते. वाहनामध्ये सर्वात एक महत्त्वाचा भाग म्हणजे इंजिन या इंजिनामध्ये असलेल्या विविध प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावणारे अनेक भाग असतात. त्यापैकी ऑइल फिल्टर हा एक. त्याचे काम महत्त्वाचे आहेच पण ते कसे व त्याची जबाबदारी काय ते पाहाण्यासारखे आहे.
इंजिनात असलेले तेल वंगणाची म्हणजे ल्युब्रिकेशनची प्रक्रिया पार पाडत असते,त्यामुळे मोटारीचे महत्त्वाचे असे इंजिन ऊर्जा तयार करून मोटार गतीमान करीत असते, त्या कामात हे वंगण गरजेचे असते. या इंजिनात वंगण तेल नीटपणे फिरत राहिले पाहिजे ते स्वच्छ असले पाहिजे हे ही त्याचप्रमाणे महत्त्वाचे असते. ते पाहाण्याची जबाबदारी या ऑइल फिल्टरची असते. इंजिनातील ऑइल पंप हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे जो वंगणाचे कार्य नीट करून देत असतो. या इंजिनात तेलाचे अभिसरण तो करीत असतो. त्यावर नियंत्रण करीत असतो. त्यामुळे इंजिनाला चांगल्या पद्धतीने वंगण केले जात असते. इंजिनातील तेलाच्या साठ्यातून तो ते इंजिनातील तेलाच्या साठ्यातून ऑइल पंप तेल खेचून घेतो व तो इंजिनात फिरवत असतो. त्यातील तेलाचा हा साठा क्रॅन्ककेसला संलग्न असतो.इंजिन चालू असताना त्यात तेलाद्वारे वंगण केले जाते त्याचवेळी ते तेल तेलसाठ्यात ते पडते. तेथे हे तेल थंडही होत असते. ऑइल पंपमधून तेल हे ऑइल फिल्टरमध्ये टाकले जाते. त्या तेलात काही बारीक धुळीचे कण किंवा धातूचे अन्य अनावश्यक बारीक घटक असतात. ते या फिल्टरमध्ये अटकले जावेत आणि त्यातून गाळून निघालेले तेल हे पुन्हा वापरासाठी चांगल्या रितीने इंजिन वंगणाच्या कामात परत फिरते. या इंजिनात ही घाण टाऊ नये यासाठी ऑइल फिल्टर महत्त्वाची भूमिका पार पाडीत असतो.
ऑइल फिल्टरच्या सुरुवातीच्या भागातून तेल आत शिरते तेथून ते इंजिनच्या मुख्य तेल प्रवाहात येते. सध्याच्या इंजिनात हे तेल ऑइल फिल्टरमधून प्रथम जाते.