शेवटी व्होल्वो ती व्होल्वोच! दहा लाख मैल कार चालविणाऱ्याला दिली नवी कोरी कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 04:14 PM2023-03-20T16:14:21+5:302023-03-20T16:18:12+5:30
आज जगात कोणत्या कंपनीच्या कार सर्वाधिक विश्वास ठेवण्यासारख्या, परवडणाऱ्या असे विचारले असता जो-तो त्याच्या त्याच्या अनुभवाप्रमाणे उत्तर देईल. परंतू, यामध्ये टोयोटा कंपनीचे नाव पुढे असेल.
आज जगात कोणत्या कंपनीच्या कार सर्वाधिक विश्वास ठेवण्यासारख्या, परवडणाऱ्या असे विचारले असता जो-तो त्याच्या त्याच्या अनुभवाप्रमाणे उत्तर देईल. परंतू, यामध्ये टोयोटा कंपनीचे नाव पुढे असेल. कारण टोयोटाच्या जुन्या इनोव्हा, क्वालिस सारख्या कार आजही चांगल्या चालत आहेत. काही कारनी २ लाख काही कारनी चार- पाच लाख किमींचे अंतर कापलेले आहे. परंतू, जगात अशी एक कार आहे ज्या कारने १० लाख मैलांचे अंतर कापलेले आहे.
ही कार व्होल्वोची आहे. आता व्होल्वोच्या कारच्या किंमती सर्वांना माहिती आहेत. जो घेणारा असतो ते थोडीच १०-१५ वर्षे ती कार वापरतो. तो तीन-चार वर्षांनी मन उडाले की नवीन कार घेतो. परंतू एका FOX 2 St. Louis युट्युब चॅनलवर जिम ओशिआ यांनी व्होल्वोची कार थोडी नव्हे तर दहा लाख मैल चालविली आहे. १९९१ ची ही Volvo 740 GLE सेदान कार आहे. महत्वाचे म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांना व्होल्वो नको तर फोर्डची कार घे असे सुचविले होते.
कारण तेव्हा फोर्डच्या कार प्रसिद्ध होत्या. आजही आहेत. परंतू जिमने तेव्हा मी ही कार तुम्हाला कित्येक दशलक्ष मैल चालवून दाखवेन असा शब्द दिला होता. जेव्हापासून जिमने कार घेतली तेव्हापासून त्याच्या अवतीभवतीच्या अनेक गोष्टी बदलल्या, पण हा कार काही त्याने बदलली नाही.
पाच लाख मैलांचे अंतर पार पाडल्यानंतर जिमने कारचे इंजिन दुरुस्त केले होते. त्याची ही कार पत्नीही चालवायची. तिने अनेकदा ही कार ठोकली होती. ही कार एवढी मेन्टेन आहे की आजही ती १२० किमीचा वेग पकडते. आता या कारला ३० वर्षे झाली म्हणून जिम नवी कार घेण्यासाठी व्होल्वोच्या डीलरकडे गेला. ही बातमी व्होल्वो कंपनाला लागली आणि त्यांनी नव्या जमान्यातील व्होल्वो कारच Volvo S60 जिमला भेट देऊन टाकली आहे. महत्वाचे म्हणजे व्होल्वो पुढील दोन वर्षे मोफत जिमच्या कारची काळजी घेणार आहे.