दंडाची रक्कम वाढविल्याने भ्रष्टाचारही वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 05:47 AM2019-08-28T05:47:17+5:302019-08-28T05:47:52+5:30
दिवाकर रावते : कोणतेही विशेष अधिकार नसल्याने राज्याचे परिवहन खाते अपंग असल्याची खंत व्यक्त
कल्याण : राज्याचे परिवहन खाते हे अपंग आहे. त्याला कोणतेही अधिकार नाहीत. केंद्रात वाहतूक विषयक कायदे करताना राज्याला विचारात घेतले जात नाही. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी वाहन चालवताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून वसुल करायची दंडाची रक्कम वाढवली. त्याची अंमलबजावणी आमच्याकडून करुन घेतली जात आहे. दंडाची रक्कम वाढल्याने भ्रष्टाचाराला अधिक वाव मिळणार आहे, अशा शब्दांत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आपली नाराजी मंगळवारी व्यक्त केली.
कल्याण आरटीओ कार्यालयाच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम उंबर्डे वाडेघर
पार पडला. या वेळी रावते बोलत होते. ते म्हणाले की, यापूर्वी पाचशे रुपये दंड आकारला जात होता. त्यावेळी नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पोलीस १०० रुपये घेऊन पावती फाडत नव्हते.
ते पैसे त्यांच्या खिशात जात होते. आता दंडाची रक्कम एक हजार रुपये आहे. त्यामुळे आता किती पैसे पोलिसांच्या खिशात जात असतील याचा विचार तुम्हीच करा. पोलिसांकडून होणाºया वसुलीमुळे आरटीओचे अधिकारी बदनाम होत आहेत.
‘युतीचा निर्णय दोघेच घेणार’
शिवसेना भाजप युतीच्या जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रकांत पाटील हे सांगत असल्याकडे रावते यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, पाटील हे आपण भाजपचा अध्यक्ष असल्याचे दाखवत आहेत. प्रत्यक्षात युतीचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या चर्चेअंती होणार आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील काहीही बोलले तरी त्याचा उपयोग होणार नाही.
‘घरबसल्या मिळेल वाहन क्रमांक’
च्परिवहन खात्यात अनेक सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून काही बदल करणे अद्याप बाकी आहे. वाहन क्रमांक घेण्यासाठी आरटीओ कार्यालयात यावे लागणार नाही. तो आॅनलाइन घरच्या घरी मिळेल, अशी व्यवस्था करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे रावते यांनी सांगितले.