आता विदेशातही होणार 'या' कारची विक्री, कंपनीने सुरू केली निर्यात, काय आहे खासियत?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 09:20 AM2022-09-13T09:20:13+5:302022-09-13T09:21:43+5:30
volkswagen virtus sedan : कंपनीच्या म्हणण्यानुसार, निर्यातीच्या पहिल्या टप्प्यात 3,000 हून अधिक वाहने भारतातून मेक्सिकोला पाठवली जात आहेत.
नवी दिल्ली : वाहन निर्माता कंपनी स्कोडा ऑटो फोक्सवॅगनने आपल्या मध्यम आकाराची सेडान 'व्हर्टस'ची भारतातून निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात कंपनीने सोमवारी माहिती दिली. कंपनीने सांगितले की, भारतातून निर्यात होणाऱ्या वाहनांच्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, निर्यातीच्या पहिल्या टप्प्यात 3,000 हून अधिक वाहने भारतातून मेक्सिकोला पाठवली जात आहेत. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड फोक्सवॅगन ग्रुपच्या 5 ब्रँड्स - स्कोडा, फोक्सवॅगन, ऑडी, पोर्श आणि लॅम्बोर्गिनीच्या भारतीय ऑपरेशनचे व्यवस्थापन करते. सेडान ब्रँडच्या भारत 2.0 मोहिमेचा एक भाग आहे आणि ती महाराष्ट्रातील चाकण येथील कंपनीच्या प्लांटमध्ये तयार केली जात आहे.
भारतातून कारची निर्यात
स्कोडा ऑटो फोक्सवॅगनने 2011 मध्ये भारतातून निर्यात सुरू केली आणि दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेसाठी भारतात निर्मित 'व्हेंटो' ची 6,256 युनिट्स निर्यात करणारी पहिली कंपनी होती. कंपनीने जून 2022 पर्यंत भारतातून 550,000 हून अधिक कार अनेक बाजारपेठांमध्ये निर्यात केल्या आहेत, ज्यामध्ये मेक्सिको ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कंपनी दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका, आफ्रिका, आग्नेय आशिया, आखाती देश आणि कॅरिबियन प्रदेशातील 44 देशांमध्ये कार निर्यात करते.
किती आहे किंमत?
फोक्सवॅगन इंडियाने या वर्षी जूनमध्ये व्हर्टस भारतात लाँच केली होती. या कारची सुरुवातीची किंमत 11.21 लाख रुपये ठेवण्यात आली होती. टॉप-स्पेक परफॉर्मन्स-लाइन व्हेरिएंटसाठी कारची किंमत 17.91 लाख रुपयांपर्यंत जाते. व्हर्टसला कम्फर्टलाइन, हायलाइन आणि टॉप लाइन आणि जीटी या चार ट्रिममध्ये ऑफर केली जाते. फोक्सवॅगन व्हर्टस दोन इंजिनांच्या ऑफरसह आणली आहे. यात पहिले 115PS 1-लिटर आणि दुसरे 150PS 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे.
काय आहेत फीचर्स?
व्हर्टसच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, यात 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, 8-स्पीकर साउंड सिस्टम, अॅम्बियंट लाइटिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, सिंगल-पॅन सनरूफ, कनेक्टेड कार टेक, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल आणि स्टीयरिंग-माउंट ऑडिओ कंट्रोल सिस्टम देण्यात आले आहे.