'ही' भारतीय बाईक बघून बुलेटही वाटेल 'पानी कम'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 04:26 PM2018-08-10T16:26:21+5:302018-08-10T16:32:27+5:30
बुलेटप्रेमींनाही या बाईकची भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही.
'ही' भारतीय बाईक बघून बुलेटही वाटेल 'पानी कम'
भारतात पुढील दोन दिवसात एक सुस्साट अशी भारतीय बनावटीची बाईक अवतरणार आहे. जिला पाहून बुलेटप्रेमींनाही या बाईकची भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही. चला पाहुया कोणती आहे ही धाकड बाईक...
इंडियन मोटरसाइकल्स या कंपनीने गेल्यावर्षीच इंडियन चीफटेन इलाईट ही बाईक पहिल्यांदा दाखविली होती. ही मोटारसायकल भारतात येत्या 12 ऑगस्टला लाँच केली जाणार आहे. या बाईकमध्ये थंडरस्ट्रोक 111 व्ही- ट्वीन हे 1811 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन एवढे शक्तीशाली आहे की, 3 हजार आरपीएमलाच ते 161.6 न्युटन मीटर टॉर्क निर्माण करते.
कंपनीने अद्याप बाईकचे इंजिन निर्माण करत असलेल्या ताकदीविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. तरीही हे इंजिन 100 बीएचपी ताकद निर्माण करेल अशी अपेक्षा आहे.
महत्वाची बाब म्हणजे, Chieftain Elite ची केवळ 350 बाईकच बनविण्यात येणार आहेत. मात्र, प्रत्येक बाईकचे डिझाईन हे वेगळे असणार आहे.
आणखी एक वेगळी बाब म्हणजे, या बाईकची रंगरंगोटी वेगवेगळ्या पद्धातीने करण्यात येणार आहे. एक बाईक रंगविण्यासाठी तब्बल 25 तास लागतात.
Indian Chieftain Elite या बाईकमध्ये एखाद्या कारमध्ये असतात तशा सुविधा असणार आहेत. यामध्ये चालविणाऱ्यासाठी व सह प्रवाशासाठी फ्लोरबोर्ड अॅडजेस्ट करण्याची सुविधा असणार आहे. तो अॅल्युमिनिअमपासून बनणार आहे. याचबरोबर क्रूज कंट्रोल, फ्लेअर पावर विंडशील्ड, कीलेस एंट्री, रिमोट लॉकिंग सैडलबॅग्स, लेदर सीट आणि हायवे बारही असणार आहे.
तसेच बाईकमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम असणार आहे. 200 वॉटच्या ऑडिओ सिस्टीमसह टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम असणार आहे. स्मार्टफोन कनेक्टिविटी और यूएसबी पोर्ट ची सुविधा तर सांगायलाच नको.