120 किमीची रेंज; 110kmph चा टॉप स्पीड; जबरदस्त Electric Bike झाली लाँच, पाहा किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 03:23 PM2021-11-28T15:23:05+5:302021-11-28T15:23:21+5:30
Electric Vehicle : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक जण इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताना दिसत आहेत.
अहमदाबादची इलेक्ट्रीक टू व्हिलर कंपनी Svitch Bike नं भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रीक मोटरसायकल CSR 762 सादर केली आहे. देशातील परवडणाऱ्या बाईक पैकी ही एक असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या वर्षाच्या अखेरिस इलेक्ट्रीक सुपरबाईक लाँच करणार असल्याची माहिती यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कंपनीनं दिली होती.
या बाईकच्या खास बाबींबद्दल सांगायचं झालं तर CSR 762 इलेक्ट्रीक मोटरसायकलमध्ये 3.6KW बॅटरी देण्यात आली आहे. तसंच ही बॅटरी अगदी सहजरित्या काढता येऊ शकते. या बाईकचा टॉप स्पीड 110 किमी प्रति तास इतका आहे. तर या बाईकची बॅटरी फुल चार्च केल्यानंतर तची 120 किमीची रेंज देते. बाईकमध्ये 30 लिटरची बुट स्पेसही देण्यात आली आहे. यामध्ये हेलमेट, रायडिंग गिअर्स, फोन चार्जर आणि अन्य सामान ठेवण्यात आलेलं आहे.
किती आहे किंमत?
स्विच बाईकनं दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारच्या 40 हजार रूपयांच्या सब्सिडीसह या ई मोटरसायकलची किंमत 1 लाख 65 हजार ते 1 लाख 90 हजारांदरम्यान असेल. संपूर्ण भारतात डिलर्स आणि डिस्ट्रिब्युटर्ससह 125 टचपॉईंट्स उभारले आहेत आणि 250 टचपॉईंट्स लवकरच उभारले जाणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. टच पॉईंट्समध्ये ग्राहकांना बॅटरी स्वॅपिंगसाठीही इन्फ्रास्ट्रक्चरही असेल.