भारतात तयार झालेली 'ही' बाईक फक्त 3 सेकेंदात घेते 100 Kmph स्पीड, एक थेंब पेट्रोलही लागत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 12:11 PM2022-05-08T12:11:17+5:302022-05-08T12:12:31+5:30

2022 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी या ई-बाईकची प्री-बुकिंग सुरू करण्यात  येणार आहे.

Indian made trove motor electric start up bike takes 100 kmph speed in just 3 seconds | भारतात तयार झालेली 'ही' बाईक फक्त 3 सेकेंदात घेते 100 Kmph स्पीड, एक थेंब पेट्रोलही लागत नाही

भारतात तयार झालेली 'ही' बाईक फक्त 3 सेकेंदात घेते 100 Kmph स्पीड, एक थेंब पेट्रोलही लागत नाही

googlenewsNext

भारतीय बाजारांत इलेक्ट्रिक वाहने आता ट्रेंडमध्ये आली आहेत. दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांनी तर पार वातावरणच बदलून टाकले आहे. प्रत्येक जण या संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे. रोजच्या रोज नव-नवीन स्टार्टअप इलेक्ट्रिक दुचाक्या लॉन्च करत आहेत. यांपैकीच एक म्हणजे आयआयटी-दिल्लीमध्ये बनवलेली ट्रोव्ह मोटर. यांनी नुकताच इलेक्ट्रिक हायपर-स्पोर्ट्स बाईकचा टीझरही रिलीज केला आहे. 2022 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी या ई-बाईकची प्री-बुकिंग सुरू करण्यात  येणार आहे. ही बाईक घेऊ इच्छिनारे लोक कंपनीच्या वेबसाइटच्या माध्यमाने ही बाईक बूक करू शकतात.

200 किमी/तास स्पीडचा दावा -
पूर्णपणे फेअर्ड असलेल्या या इलेक्ट्रिक बाईकची टॉप स्पीड 200 किमी/तास असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, ही बाईक केवळ तीन सेकंदात 0-100 किमी/तास एकवढा स्पीड पकडते, असा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे. या बाईकला एलईडी अॅडव्हॉन्स्ड इंफोटेनमेंट डिस्प्ले, जीपीएस नेव्हिगेशन आणि रियर टाईम व्हेईकल डायग्नोस्टिक सारखे इतर अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ही बाईक ग्लोबल लेव्हलवरही लॉन्च केली जाईल. तसेच, ही जगातील सर्वात सुरक्षित दुचाकी, असेल. येणाऱ्या काही महिन्यांत, फुल फेअर्ड शिवाय, नेकेड स्ट्रीट बाईक, स्क्रँबलर आणि अँड्यूरो मॉडेलही लॉन्च केले जाईल.

असतील जबरदस्त फीचर्स -
या सुपरबाईकला पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेन देण्यात आले आहे. यात 40 किलोवॅट शक्ती निर्माण करणारी लिक्विड-कूल्ड एसी इंडक्शन मोटर आहे. ही बाईक लॉन्च झाल्यानंतर, हिचा सामना थेट अल्ट्राव्हॉयलेट F77 सोबत असेल. यात टीव्हीएस मोटर कंपनीने पैसा लावला आहे. बाईक सोबत जबरदस्त फीटर्सदेखील मिळणार आहेत. ज्यात, लेझर लायटिंग पॅकेज, 360-डिग्री कॅमेराा, टीएफटी टचस्क्रीन डिस्प्ले, कनेक्टेड फीचर्स, ब्रेम्बो ब्रेक्ससह ड्युअल-चॅनल ABS, अॅडजस्टेबल सस्पेंशन आणि इतरही काही खास फीटर्स देण्यात आली आहेत. ही बाईक दिसायलाही अत्यंत आकर्षक आहे.

Web Title: Indian made trove motor electric start up bike takes 100 kmph speed in just 3 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.