Cheapest Electric Car: भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत फक्त 4.70 लाख; मोबाईलनेही केली जाऊ शकते नियंत्रित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 03:00 PM2022-11-16T15:00:26+5:302022-11-16T15:04:59+5:30
PMV Eas-E Price And Features : महत्वाचे म्हणजे, ही कार सर्वात स्वस्त असण्याबरोबरच देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार देखील आहे.
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (Cheapest Electric Car) लॉन्च करण्यात आली आहे. मुंबईतील स्टार्टअप पीएमव्ही इलेक्ट्रिकने ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. ही एक मायक्रो-इलेक्ट्रिक कार असून हिला ईएएस-ई (EAS-E) असे नाव देण्यात आले आहे. कंपनीने तिची किंमत 4.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी ठेवली आहे. मात्र ही किंमत केवळ सुरुवातीच्या 10 हजार ग्राहकांसाठीच असेल. लॉन्चिंगपूर्वीच या कारला 6000 बुकिंग मिळली आहे. ग्राहकांना ही कार कंपनीच्या वेबसाइटवरून बूक करता येऊ शकते.
आकारानेही सर्वात लहान कार -
महत्वाचे म्हणजे, ही कार सर्वात स्वस्त असण्याबरोबरच देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार देखील आहे. PMV Eas-E इलेक्ट्रिक कार पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 200 किमी पर्यंतची रेंज देते. तिची टॉप स्पीड 70 किमी प्रतितास एवढी आहे. विशेष म्हणजे, ही इलेक्ट्रिक स्मार्ट कार मोबाईल फोनद्वारेही नियंत्रित केली जाऊ शकते.
या कारसोबत IP67 रेटिंग सह 10 Kwh चा लिथिअम आयर्न फॉस्फेट बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक कारला PMSM इलेक्ट्रिक मोटर द्वारे संचालित केली जाईल. या कालला 10kw पॉवरसह 500 Nm चा टार्क देखील मिळतो.
PMV ने दावा केला आहे, की Eas-E इलेक्ट्रिक कारची ऑपरेटिंग किंमत 75 पैसे/किमी पेक्षाही कमी आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये ऑन बोर्ड नेव्हिगेशनसह क्रुझ कंट्रोल, रिमोट पार्किंग, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आले आहे. एवढेच नाही, तर या कारच्या सुरक्षिततेसंदर्भात कसल्याही प्रकारची तडजोड करण्यात आलेली नाही. या कारमध्ये हाय स्ट्रेंथ शीट मेटलसह एअरबॅग आणि सीटबेल्ट देखील देण्यात आला, असेल्याचे कंपनीने म्हटले आहे.