भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लॉन्च, सिंगल चार्जवर २२० किमी रेंज अन् किंमत किती जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 06:54 PM2022-01-24T18:54:23+5:302022-01-24T18:55:34+5:30
भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाइक (Indias First Electric Cruiser Bike) कोमाकी रेंजर (Komaki Ranger) लॉन्च झाली आहे. विशेष म्हणजे ही बाईक अगदी हार्ले डेविडसनसारखी (Harley Davidson) दिसते.
भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाइक (Indias First Electric Cruiser Bike) कोमाकी रेंजर (Komaki Ranger) लॉन्च झाली आहे. विशेष म्हणजे ही बाईक अगदी हार्ले डेविडसनसारखी (Harley Davidson) दिसते. वीजेवर चालणारी ही बाईक सिंगल चार्जवर १८० ते २२० किमी ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा खुद्द कंपनीनं केला आहे. बाईकमध्ये ४ हजार वॉटची मोटर बसवण्यात आली आहे. कंपनीनं ही बाईक एकूण तीन रंगात उपलब्ध केली आहे. यात Garnet Red, Deep Blue आणि Jet Black या रंगांचा समावेश आहे. बाईकची किंमत १.६८ लाखांपासून सुरू होते. या बाईकसोबतच कंपनीनं कोमाकी वेनिस (Komali Venice) देखील लॉन्च केली आहे.
कोमाकी वेनिस इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आयसी क्रूझरचं इंजिनचा वापर केला आहे. जे हार्ले डेविडसन आणि रॉयल एनफील्ड इत्यादी बाईक्समध्ये याआधीपासून वापरण्यात येत आहे. इलेक्ट्रिक क्रूझर बाईकमध्ये ग्रोसर व्हील्स, क्रोम एक्टीरियर्स आणि फाइन पेंट जॉबचा वापर केला गेला आहे. या मोटारसायकलमध्ये 4kW ची बॅटरीचा वापर केला गेला आहे. जी भारतातील सर्वात मोठी टू-व्हिलर बॅटरी आहे. बाईक सिंगल चार्जमध्ये १८०-२०० किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज उपलब्ध करुन देते.
Komaki Ranger चे फिचर्स
कोमाकी रेंजर बाईकमध्ये ब्लूटूथ साऊंड सिस्टम, साइट स्टँड सेंसर, क्रूझर कंट्रोल फिचर्स, अँडी थेफ्ट लॉकिंग सिस्टम असे अत्याधुनिक फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यासोबतच ड्युअल स्टोरेज बॉक्सचा पर्याय देखील उपलब्ध आहे. चालकाचा विचार करुन यात आरामदायक सीट देण्यात आली आहे. तसंच ट्रिपल हेड लँपचा वापर करण्यात आला आहे.
किंमत आणि उपलब्धता
कोमाकी रेंजर क्रूझर बाईक २६ जानेवारी रोजी कोमाकी डीलरशीपकडून तुम्हाला विकत घेता येणार आहे. याची एक्स शो रुम किंमत १.६८ लाखांपासून सुरू होत आहे.