Electric Chargers: आता घरीच बसवा इलेक्ट्रिक कारसाठी चार्जर, फक्त 'इतका' खर्च करावा लागेल, केजरीवाल सरकारचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 12:39 PM2021-11-09T12:39:05+5:302021-11-09T12:39:58+5:30

Delhi Electric Chargers: दिल्ली सरकार मॉल्स, अपार्टमेंट्स, हॉस्पिटल्स आणि शहरातील इतर ठिकाणी दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसह हलक्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी वैयक्तिक चार्जर बसविण्यासाठी केवळ 2,500 रुपये शुल्क आकारेल.

Installation of Private Electric Vehicle Charger Will Cost Delhi Residents Rs. 2,500 | Electric Chargers: आता घरीच बसवा इलेक्ट्रिक कारसाठी चार्जर, फक्त 'इतका' खर्च करावा लागेल, केजरीवाल सरकारचा निर्णय 

Electric Chargers: आता घरीच बसवा इलेक्ट्रिक कारसाठी चार्जर, फक्त 'इतका' खर्च करावा लागेल, केजरीवाल सरकारचा निर्णय 

Next

नवी दिल्ली : देशात इंधनाच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांसह सरकार पायाभूत सुविधांवरही भर देत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनेही पुढाकार घेतला आहे. आता दिल्लीत तुम्हाला इलेक्ट्रिक वाहन चार्जर बसवण्यासाठी फक्त 2,500 रुपये खर्च करावे लागतील.

दिल्लीचे परिवहन मंत्री गोपाल राय यांच्या मते, दिल्लीतील सरकार चार्जिंग स्टेशनसाठी पहिल्या 30,000 अर्जदारांना 6,000 रुपये सबसिडी देत ​​आहे, ज्यामुळे प्रत्येक चार्जरची प्रभावी किंमत सुमारे 2,500 रुपये आहे. गोपाल राय यांनी सांगितले की, दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे चार्जर्सची किंमत 70 टक्क्यांपर्यंत कमी होईल.

हेल्पलाइन नंबरवर कॉल करून घेऊ शकता लाभ 
दिल्ली सरकार मॉल्स, अपार्टमेंट्स, हॉस्पिटल्स आणि शहरातील इतर ठिकाणी दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसह हलक्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी वैयक्तिक चार्जर बसविण्यासाठी केवळ 2,500 रुपये शुल्क आकारेल. दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनी सिंगल विंडो सुविधेचा शुभारंभ करताना ही घोषणा केली की, ग्राहक संबंधित डिस्कॉम पोर्टलला भेट देऊन किंवा खाजगी चार्जिंग स्टेशनच्या स्थापनेसाठी हेल्पलाइन नंबरवर कॉल करून लाभ घेऊ शकतात.

असा करा चार्जरसाठी अर्ज
- अर्ज करण्यासाठी पहिल्यांदा अर्जदाराने पोर्टलवर जावे.
- सरकारने वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या चार्जरमधून तुमचे विश्वसनीय इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जर निवडा.
- इतकेच नाही तर तुम्ही या चार्जर्सच्या किंमतींची तुलना करू शकता आणि त्यांना ऑनलाइन किंवा फोन कॉलद्वारे ऑर्डर करू शकता.
- इलेक्ट्रिक वाहन  (EV) चार्जरची स्थापना आणि ऑपरेशन अर्ज सबमिट केल्यापासून सात कामकाजाच्या दिवसांत पूर्ण केले जाईल.

दोन पर्यायांसह उपलब्ध
अर्जदार कमी ईव्ही दराचा लाभ घेण्यासाठी नवीन वीज कनेक्शनचा (प्री-पेड मीटरसह) पर्याय निवडू शकतात किंवा सध्याचे कनेक्शन चालू ठेवू शकतात. दिल्ली डायलॉग अँड डेव्हलपमेंट कमिशनचे (DDC) उपाध्यक्ष जैस्मिन शाह यांच्या मते, भारतात प्रथमच मॉल्स, कार्यालये, निवासी सोसायट्या, महाविद्यालयांमध्ये खाजगी चार्जर बसवण्याची सिंगल विंडो सुविधा दिली जात आहे. या ईव्ही चार्जिंग पॉइंट्सद्वारे वापरल्या जाणार्‍या विजेसाठी सरकारने निश्चित केलेला दर 4.5 रुपये प्रति युनिट आहे.
 

Web Title: Installation of Private Electric Vehicle Charger Will Cost Delhi Residents Rs. 2,500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.