स्कूटरच्या सुरक्षेसाठी लोखंडी गार्ड लावून घेणे महत्वाचेच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 01:53 PM2017-08-29T13:53:39+5:302017-08-29T13:58:34+5:30

रस्त्यावरचे खड्डे, गति अवरोधक तीव्र वळणे तसेच वाहतुकीत परस्परांच्या जवळून जाणारी वाहने या सर्वांचा विचार करता स्कूटरसारखे वाहन म्हणजे तसे खूप नाजूकच. त्यामुळे स्कूटरच्या सुरक्षेसाठी लोखंडी गार्ड लावून घेणे महत्वाचेच.

It is important to set up an iron car for scooter protection | स्कूटरच्या सुरक्षेसाठी लोखंडी गार्ड लावून घेणे महत्वाचेच

स्कूटरच्या सुरक्षेसाठी लोखंडी गार्ड लावून घेणे महत्वाचेच

Next
ठळक मुद्देलोखंडी पाइपासारख्या आकाराने तयार केलेले हे मडगार्ड उपयुक्त व जड वजनही सहन करण्यासारखे आरेखित केलेले असते.दुसऱ्या वाहनाचा हलकासा धक्का लागला तरी टेल लँम्प फुटण्याची शक्यता असते, ते या गार्डमुळे काही प्रमाणात रोखले जाते.

रस्त्यावरचे खड्डे, गति अवरोधक तीव्र वळणे तसेच वाहतुकीत परस्परांच्या जवळून जाणारी वाहने या सर्वांचा विचार करता स्कूटरसारखे वाहन म्हणजे तसे खूप नाजूकच. त्यात पूर्वीसारख्या लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने बॉडी तयार केलेल्या स्कूटर्सची संख्या कमी, त्यात स्कूटर्सची रचना ही ट्युब्युलर चासी पद्धतीची असल्याने एकंदर स्कूटरचा समतोल साधणे अतिशय वर्दळीच्या वा खड्डेमय रस्त्यामध्ये तसा सोपा नसतो. त्यामुळे होते काय, तोल गेला तर स्कूटरला सावरण्याचे काम करणे कठीण होऊन बसते. नुकसान व्हायचे ते काही वेळा होतेच पण ते नुकसान स्कूटरच्या बॉडीला होऊ नये, यासाठी स्कूटर्सना गार्ड लावण्याची शक्कल निघाली असावी. लोखंडी पाइपासारख्या आकाराने तयार केलेले हे मडगार्ड उपयुक्त व जड वजनही सहन करण्यासारखे आरेखित केलेले असते. तसेच मागे बसणाऱ्याला पाय ठेवून नीट बसता यावे यासाठीही स्कूटरचे गार्ड खूप महत्त्वाचे आहे. यामुळे मागे बसलेल्या व्यक्तीला स्वतःला सांभाळणे व स्वतःचा तोल राखणे तसे सोपे जाते. आजच्या काळातील नव्या काही स्कूटर्सना ते दिलेले नाही, त्याला जागाही दिलेली नाही. शोबाजीच्या जमान्यातील हा एक मोठा त्रुटीचा भाग आहे असे म्हणावे लागते.
स्कूटरला तळात मागील बाजूने फुटबोर्डपर्यंत असलेले गार्ड व पुढील चाकाच्या मडगाडर्वर असलेले गार्ड ही दोन प्रामुख्याने असणारी गार्डस् आहेत. पार्किंग केलेल्या स्कूटरला पायाने स्टँडवरून खेचून ती सुरू करण्यासाठी बाजूला उभे राहावे लागण्याची जुन्या प्रकारच्या जड स्कूटर्सची परिस्थिती आज नसली तरी स्कूटर सुरू करण्याआधी स्टँडवरून उतरावावी लागते. अशावेळी तेथे खड्डा असेल किंवा उतार असेल तर स्कूटर सांभळण्यासाठीचा तोल जाण्याची शक्यता असते. स्कूटर पडली तर तिच्या बॉडीचे नुकसान होऊ नये यासाठी हा स्टँड खूप महत्त्वाची कामगिरी बजावतो. त्याचप्रमाणे स्कूटर थेट पायावर येऊ नये यासाठीही स्टँडची मदत होत असते. पंक्चर झाल्यास स्कूटर आडवी करावी लागते, व स्कूटरचे चाक काढावे लागते, परत लावावे लागते, अशावेळी स्कूटरच्या स्टँडमुळे स्कूटरच्या बॉडीला व हँडलला धक्का लागत नाही. वाहतुकीमध्ये मागून दुसऱ्या वाहनाचा हलकासा धक्का लागला तरी टेल लँम्प फुटण्याची शक्यता असते, ते या गार्डमुळे काही प्रमाणात रोखले जाते. अर्थात गार्डची रचना ही केवळ शोबाजीसाठी नसावी, त्यासाठी ते नीट आरेखित केलेले असावे. पुढील चाकाच्या मडगार्डवर असलेल्या लोखंडी गार्डमुळेही पुढील वाहनावर जाऊन आदळणल्यास तुमच्या स्कूटरच्या चाकावर असलेल्या पत्रा वा बॉडीचे नुकसान काही क्षमतेच्या धक्क्यापर्यंत तरी थोपवले जाते. महिलांना व पुरुषांना मागील आसनावर बसलेले असताना हे आधार असणारे गार्ड, तुम्हाला स्कूटर चालवताना तोल गेल्य़ास काही प्रमाणात सावरणारे गार्ड हे म्हमूनच अतिशय महत्त्वाचे अतिरिक्त साधन आहे. त्यामुळे ते खराब झाले असेल तर वेळीच बदलून घेणे किंवा नीट बसलेले नसल्याचे वाटत असेल तर ते तपासून नटी बळकट करून घेणे हे प्रत्येक स्कूटर चालकाने न विसरता करायला हवे.

Web Title: It is important to set up an iron car for scooter protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.