कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी! प्रवास करणाऱ्या सर्वांनाच आता...; गडकरींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 12:04 PM2022-02-11T12:04:29+5:302022-02-11T12:05:56+5:30

कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय; गडकरींनी दिली माहिती

It Is Now Mandatory For All Seats In The Car To Have Threepoint Seat Belts | कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी! प्रवास करणाऱ्या सर्वांनाच आता...; गडकरींची मोठी घोषणा

कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी! प्रवास करणाऱ्या सर्वांनाच आता...; गडकरींची मोठी घोषणा

googlenewsNext

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी रस्ते अपघातातील जीवितहानी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारमध्ये बसणाऱ्या सर्व प्रवाशांना थ्री पॉईंट सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सर्व प्रवाशांसाठी थ्री पॉईंट सीट बेल्ट देणं बंधनकारक असेल. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत गडकरींनी याबद्दलची माहिती दिली.

कारमध्ये मागील सीटवर मध्ये बसणाऱ्या व्यक्तीसाठी थ्री पॉईंट सीट बेल्टची व्यवस्था नसते. मात्र यापुढे कार निर्मिती कंपन्यांना मध्यभागी बसणाऱ्या प्रवाशासाठीही थ्री पॉईंट सीट बेल्ट उपलब्ध करून द्यावा लागेल, असं गडकरी म्हणाले. 'याबद्दलच्या फाईलवर मी कालच स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता कारच्या मागील सीटवर मध्ये बसणाऱ्या व्यक्तींसाठीही थ्री पॉईंट सीट बेल्ट देणं कंपन्यांना बंधनकारक असेल,' असं गडकरींनी सांगितलं. 

सध्या कारमध्ये पुढच्या दोन्ही सीटवर आणि मागे असलेल्या दोन्ही सीटवर थ्री पॉईंट सीट बेल्ट उपलब्ध असतात. मागच्या सीटवर मध्ये बसलेल्या प्रवाशाला केवळ टू पॉईंट सीट बेल्ट देण्यात येतो. मात्र प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन सीट बेल्ट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी देशात जवळपास ५ लाख रस्ते दुर्घटना होतात. त्यात दीड लाख लोकांचा जीव जातो. ही संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं गडकरी म्हणाले.
 

Web Title: It Is Now Mandatory For All Seats In The Car To Have Threepoint Seat Belts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.