सर्व वाहनांना बंदी दर्शवणारे चिन्ह पाळणे गरजेचे नव्हे तो आदेशच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 06:21 PM2017-10-06T18:21:09+5:302017-10-06T18:22:02+5:30
सर्व वाहनांना बंदी असणारे एक चिन्ह असते. हे चिन्ह वाहतुकीच्या नियमांमधील आदेशात्मक चिन्ह असून अशा चिन्हाचा अर्थ समजून प्रत्येकाने त्यानुसार वर्तन करायलाच हवे.
रस्त्यावर एकदा का वाहन आणले की तुम्हाला त्यावर लावलेल्या सर्व वाहतून विषयक चिन्हांची माहिती असणे गरजेचे आहे. केवळ गरज म्हणून नव्हे तर त्यामुळे असमारी सुरक्षितता ही महत्त्वाची असते. ते लक्षात घेणे गरजेचे आहे.एक चिन्ह तुम्हाला अनेक बाबतीत मार्गदर्शन करीत असते ही बाब प्रत्येक वाहनचालकांनी लक्षात ठेवायला हवी. इतकेच नव्हे तर पादचारीही रस्त्यावरून जात असतात, हे लक्षा घेऊन त्या त्या रस्त्यांच्या सुरुवातीला किंवा मधेही असणाऱ्या चिन्हांचा अर्थ लक्षात घ्यायला हवा.
रस्त्यांवरील या चिनन्हामध्ये सर्व वाहनांसाठी बंदी असा आदेश सुचवणारे एक चिन्ह फलकावर लावलेले असते. एखाद्या रस्त्याच्या सुरुवातीला वा त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हे चिन्ह असू शकते. त्या रस्त्यावर काही ना काही अडचण असेल, तेथे फेरीवाले वा बाजाराचा अतिगर्दीचा भाग असेल वा अन्य काही सुरक्षाविषयक बाब म्हणून तेथे येण्यास व जाण्यास वाहनांना बंदी असेल, अशा ठिकाणी हे चिन्ह असू शकते. लावले जाते. या चिन्हाला साधारणपणे भारतात अनेक ठिकाणी धुडकावणारेही अनेक जण दिसून येतील. मुळात वाहतुकीच्या नियमांना धरून आणि सुरळीत वाहतूक व्हावी म्हणून रस्ते पूर्ण वाहतुकीसाठी सर्व वाहनांसाठी बंद करण्याचा अधिकार वाहतू पोलीस विभागाला आहे, प्रशासनाला आहे. काही ना काही कारणे असल्याखेरीज कोणी तो रस्ता सर्व वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेत नाही. अनेकदा त्या रस्त्यावर काही दुर्घटना घडलेली असेल व काही काळ तो रस्ता जाण्यायेण्यासाठी बंद ठेवायचा असेल तर तात्पुरत्या स्वरूपात का होईना त्या ठिकाणी आडवा बांबू टाकला जातो कींना नो एंट्री म्हणून बोर्डही लावला जातो. वा सकाळच्यावेळी पोलीसही तेथे तैनात असू शकतो. मात्र सदासर्वकाळ पोलीस असेल असे नाही. तेथे वाहने येऊ नयेत, यासाठी या चिन्हाचा वापर कतरून तेथे गोल पत्र्यावर त्याचे चित्र दिसून येते. कार व मोटरसायकल काळ्या रंगाने चिन्हांकित असतात. त्याभोवती लाल रंगाचे वर्तुळ व त्याच लाल रंगाने उजव्या बाजूपासून सुरू होणारी रेष वर्तुळाच्या बॉर्डर्रपासून सुरू होऊन डाव्या बाजूला खाली चिकटवलेली असते. अशा चिन्हाचा अर्थ तुम्ही नक्की समजून वाहतुकीच्या नियमांना स्वीकारायला हवे. न जाणो अशा रस्त्यामध्ये बरेच अडथळेही असू शकतात व तुम्हालाच त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. तेव्हा आदेशात्मक चिन्हांमध्ये असणारे संकेत पाळणे हे चांगल्या चालकाचे लक्षण आहे.