अतिवृष्टीमध्ये कारमध्ये गुदमरून होणारे मृत्यू टाळता येणं शक्य आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 07:00 AM2017-09-01T07:00:00+5:302017-09-01T07:00:00+5:30

अतिवृष्टी व पूरासारख्या घटनांमध्ये वाहन वापरताना कोणत्या कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावी, याचे खरे म्हणजे प्रशिक्षण वा माहितीपुस्तक काढण्याची गरज आहे की काय, असे वाटू लागले आहे.

It is possible to avoid death in a car during floods | अतिवृष्टीमध्ये कारमध्ये गुदमरून होणारे मृत्यू टाळता येणं शक्य आहे

अतिवृष्टीमध्ये कारमध्ये गुदमरून होणारे मृत्यू टाळता येणं शक्य आहे

ठळक मुद्देकारमध्ये पाणी शिरल्याने त्यातून बाहेर न पडू शकलेल्या तरुणीचा मृत्यू  हे भीषण वास्तव आहे.यासाठी कारमध्ये तातडीची काही साधने असण्याची गरज आहे.नव्या प्रकारच्या पॉवर विंडोच्या कार, दरवाजे ऑटोमॅटिक लॉक होणाऱ्या कारला मिळालेल्या सुविधा याच्या अधीन राहून चालणार नाही.

मंगळवारी २९ ऑगस्टला मुंबईमध्ये प्रचंड पाऊस पडल्याने अगदी हाहाकार माजला होता.रस्त्यांवर अनेक गाड्या पाण्यात व वाहतूककोंडीने अडकून ठप्प झाल्या होत्या अशाच प्रकारात सायननजीक प्रियेन या ३० वर्षीय वकिलाचा त्याच्या सॅन्ट्रो कारमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. २००५मध्ये पुराच्यावेळीही कारचे दरवाजे न उघडल्याने व काचाही खाली न सरकल्याने बाहेर पडू न शकल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारच्या घटनांमुळे वाहन वापरताना कोणत्या कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावी, याचे खरे म्हणजे प्रशिक्षण वा माहितीपुस्तक काढण्याची गरज आहे की काय, असे वाटू लागले आहे.

मंगळवारीच सायनच्या पुलावर एक गाडी अशी अडकली होती, टुरिस्ट गाडीमध्ये एक महिला होती, एअर कंडिशनमध्ये सातत्याने काम करणाऱ्या आजकालच्या पिढीतील ही महिला काच खाली करायला तयार नाही, त्यामुळे छोट्या जागेत कारमधील एअर कंडिशनमुळे ती अस्वस्थ झाली, अखेर ड्रायव्हरवर संतापही तिने व्यक्त केला. पण अखेर काच थोडी उघडल्यानंतर तिला जरा बरे वाटले पण एअर कंडिशन न लावल्याने तिने ड्रायव्हरवर इतका वेळ अडकलेल्या परिस्थितीत आगपाखड चालूच ठेवली होती. वास्तविक अशा प्रकारच्या या घटनांमधून काही शिकण्याची गरज आहे.
प्रियेन यांचा मृत्यू काय किंवा २००५ मध्ये कारमध्ये पाणी शिरल्याने त्यातून बाहेर न पडू शकलेल्या तरुणीचा मृत्यू काय, हे भीषण व वास्तव आहे. यासाठी कारमध्ये तातडीची काही साधने असण्याची गरज आहे. नव्या प्रकारच्या पॉवर विंडोच्या कार, दरवाजे ऑटोमॅटिक लॉक होणाऱ्या कारला मिळालेल्या सुविधा याच्या अधीन राहून चालणार नाही. त्याच बरोबर अशी स्थिती उद्भवली तर काच फोडण्यासाठी एक छोटी हातोडी, सीटबेल्ट कापण्यासाठी एक कात्री किंवा धारदार छोटा चाकू, टॉर्च, अग्निशामक स्प्रे, पिण्यासाठी पाणी, जखम झाल्यास,ताप वाटत असल्यास किमान आवश्यक प्रथमोपचार साहित्य या साधनाचा वापर करता येऊ शकतो. हे केवळ माहिती असून उपयोगाचे नाही, तर ही साधने कारमध्ये हाताला झटकन लागतील, अशा ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. तसेच काच बंद असेल व ती उघडत नसले तर ती फोडण्यासाठी हत्यार हवेच. अशा प्रकारची आणीबाणीची स्थिती कधी उद्भवेल ते सांगता येत नाही, यासाठीच प्रत्येक कारचालक, मालक यांनी या साधनांना कारमध्ये नेहमी अद्ययावत स्थितीत ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे किमान एखाद्याचा प्राण तरी वाचू शकेल.

Web Title: It is possible to avoid death in a car during floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.