इंजिन ऑइल व फिल्टर योग्यवेळी बदलणे अतिशय गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 04:31 PM2017-11-20T16:31:35+5:302017-11-20T16:33:49+5:30

इंजिन ऑइल हे इंजिनाच्या कामामधील अतिशय मोलाचे काम करणारे तेल आहे. त्या तेलाच्या जास्तीतजास्त प्रभावी वापराबरोबरच ते अधिक काळ नीट राहावे यासाठी फिल्टरही महत्त्वाचा असतो. हा फिल्टर व तेल यांची सुयोग्य देखभाल, बदल हाच कारच्या चांगल्या आयुष्याचा मार्ग असतो.

It's very important to change the engine oil and filter at the right time | इंजिन ऑइल व फिल्टर योग्यवेळी बदलणे अतिशय गरजेचे

इंजिन ऑइल व फिल्टर योग्यवेळी बदलणे अतिशय गरजेचे

googlenewsNext
ठळक मुद्देइंजिन ऑइलमधून खराब पार्टिकल्स काढून टाकणे व तेल स्वच्छ ठेवणे हे काम हा फिल्टर करतोइंजिनातील तेल फिल्टर होणार नसेल तर ते तेल खराब होईल व त्यामुळे साहजिकच इंजिनाच्या क्षमतेवर परिणाम होईलकार उत्पादक साधारण ५ ते ६ हजार किलोमीटर इतक्या रनिंगनंतर हा फिल्टर बदलण्याची शिफारस करीत असतात

तेलाचा वापर हा कारच्या इंजिनाच्यादृष्टीने अतिशय मोलाचा व महत्त्वाचा आहे. वास्तविक कच्चा तेलापासून पेट्रोल व डिझेल तयार केले जाते. याच कच्चा तेलापासून तयार केलेले तेल इंजिन, ब्रेक अॉइल म्हणूनही वापरले जाते. इंजिनामधील अतिशय मोलाच्या कामगिरीत तेलाचा फार महत्त्वाचा वाटा आहे. अशा या तेलाचा वापर होत असताना ते तेल चांगले मिळाले पाहिजे, कारण हे तेल इंजिनामध्ये असणाऱ्या बारीक घटकांना आपल्याबरोबर घेत असते. इंजिनाच्या कार्यामध्ये त्यात असलेल्या येणारे पार्टिक्लस तेलामध्ये मिक्स होत असतात. यासाठीच हे ते गाळले जाणे गरजेचे असते. यामध्ये ऑइल फिल्टर तेलासाठी अतिशय मोलाची कामगिरी बजावतो.  

इंजिनामध्ये तेल हे अतिशय मोलाची कामगिरी करीत असते. ज्याला आपण इंजिन ऑइल म्हणतो ते हे तेल इंिजनाला थंड करीत असते. उष्णता प्रसरणापासून हे तेल इंजिन थंड करण्याचे काम करीत असते. पिस्टन रिंग्ज व सिलिंडर वॉल यांच्यामध्ये असणारी गॅप वा पोकळी भरून काढली जाते ती या तेलामुळे तसेच त्या इंजिनामध्यी प्रक्रियेत तयार होणाऱ्या पार्टिकल्स वा सूक्ष्म अशा कचऱ्याला तेलात सामावल्यानंतर त्याचा इंजिनावर परिणाम होत असतो. त्यामुळे इंजिनामधील तेल हे गाळले जाणे गरजेचे असते. अन्यथा तुम्हाला तेल सतत बदलावे लागेल. ते काम नक्कीच खर्चिक असेल. यासाठीच ऑइल फिल्टर अतिशय मोठी कामगिरी बजावीत असतो. कारमध्ये या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचे महत्त्व म्हणूनच तसे अनन्यसाधाण म्हणावे लागते. 

इंजिन ऑइलमधून खराब पार्टिकल्स काढून टाकणे व तेल स्वच्छ ठेवणे हे काम हा फिल्टर करतो. इंजिनातील तेल फिल्टर होणार नसेल तर ते तेल खराब होईल व त्यामुळे साहजिकच इंजिनाच्या क्षमतेवर परिणाम होईल. हा फिल्टर कायम तोच वापरायचा नसतो. त्याला काही ठरावीक कालमर्यादा असते. त्या अनुषंगाने कार उत्पादक साधारण ५ ते ६ हजार किलोमीटर इतक्या रनिंगनंतर हा फिल्टर बदलण्याची शिफारस करीत असतात. काहींच्या मते ज्यावेळी हे तेल ५ ते ६ हजार किलोमीटर नंतर बदलावे लागते, तेव्हाच हा फिल्टरही बदलावा अशीही काही शिफारस केली जाते. मुळात तेल काय किंवा हा फिल्टर काय वेळच्यावेळी त्या घटकांना बदलणे हे महत्त्वाचे असते. तुमच्या ड्रायव्हिंग स्थितीवर, वाहन कोणत्या भागात वापरले जाते त्या ठिकाणांवरही ऑइल व अन्य बाबींच्या देखभालीच्या व बदलाच्या काळात फरक पडत असतो. 

आज सिंथेटीक तेलही इंजिनामध्ये वापरले जाते व ते ही चांगले असल्याची अनेकांची माहिती आहे, तसा अनुभव आहे. अर्थात हे प्रत्येक वापरकर्त्यांवर अवलंबून आहे. मुळात इंजिन, ब्रेक, आदी कारमध्ये आवश्यक असणारी तेल योग्य काळामध्ये वापरणे व बदलणे जसे गरजेचे आहे तसेच त्या तेलाच्या जास्तीतजास्त उपयोगासाठी फिल्टरसारख्या महत्त्वाच्या बाबीही योग्य पद्धतीने वापरणे व बदलणे गरजेचे आहे. शेवटी कार वा वाहन हे एक यंत्र आहे व त्याची देखभाल नीट केली गेली नाही, तर साहजिकच मोठा फटका वापरकर्त्यांच्या खिशालाही बसू शकतो.

Web Title: It's very important to change the engine oil and filter at the right time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.