'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 07:56 PM2024-10-10T19:56:32+5:302024-10-10T19:57:17+5:30

iVOOMi Electric Scooters : आता इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी iVOOMi ने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरवर दहा हजार रुपयांपर्यंत सूट देण्याची घोषणा केली आहे. 

iVOOMi electric scooters get festive offers up to Rs 10,000 | 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!

'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!

iVOOMi Electric Scooters : देशात नवरात्रीपासून सणासुदीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सणासुदीचा हंगाम जवळ आला की, प्रत्येक कंपनी विक्रीला चालना देण्यासाठी नवनवीन उत्तम ऑफर्स घेऊन येत असते. आता इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी iVOOMi ने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरवर दहा हजार रुपयांपर्यंत सूट देण्याची घोषणा केली आहे. 

दहा हजार रुपयांपर्यंतच्या सवलतीव्यतिरिक्त, iVOOMi ग्राहकांच्या सोयीसाठी कर्ज पर्याय आणि शून्य डाउन पेमेंट पर्याय देखील प्रदान करत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कर्जावर कोणतेही व्याज देण्याची गरज नाही, इतकेच नाही तर ग्राहकांसाठी १४११ रुपये प्रति महिना सुरुवातीला ईएमआयची (EMI) सुविधा देखील आहे. कंपनीच्या या इलेक्ट्रिक स्कूटरवर दहा हजार रुपयांपर्यंत बंपर सवलत मिळत आहे. याशिवाय, कंपनी iVOOMi S1 सीरीजवर पाच हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे.
 
दरम्यान,  या इलेक्ट्रिक स्कूटरच्या ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलायचे झाले तर, ही स्कूटर एका फूल चार्जमध्ये १७० किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. याशिवाय, या स्कूटरमध्ये दिलेल्या बॅटरीला IP67 (डस्ट अँड वॉटर रेसिस्टंस) रेटिंग मिळाली आहे. दुसरीकडे, कंपनीची एस 1 मालिका देखील खूप चांगली ड्रायव्हिंग रेंज ऑफर करत आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत किती?
या इलेक्ट्रिक स्कूटरचे 2.1kWh आणि 3.1kWh असे दोन व्हेरिएंट्स आहेत. या व्हेरिएंट्सच्या किंमती अनुक्रमे ९९ हजार ९९९ रुपये आणि १ लाख ९ हजार ९९९ रुपये आहेत. माक्ष,  2.1kWh व्हेरिएंट दहा हजार रुपयांच्या सवलतीत आणि 3.1kWh व्हेरिएंट पाच हजार रुपयांच्या सूटसह मिळेल.

कधीपर्यंत असणार ऑफर?
iVOOMi द्वारे ऑफर करण्यात आलेली ही फेस्टिव्ह सेल डील्स केवळ मर्यादित काळासाठी आहेत. तुम्ही कंपनीच्या डीलर्सना भेट देऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकता, परंतु लक्षात असू द्या की, ही डिल्स फक्त नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत व्हॅलिड आहे.

Web Title: iVOOMi electric scooters get festive offers up to Rs 10,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.