iVOOMi Energy Electric Scooter : या महिन्यात बाजारात येणार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जवर 100 किमी रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 09:54 AM2022-06-01T09:54:47+5:302022-06-01T09:55:45+5:30

iVOOMi Energy Electric Scooter : कंपनीने 30 मे पासून आपल्या S1 ई-स्कूटरची बुकिंग सुरू केली आहे आणि जूनच्या मध्यापासून त्याची डिलिव्हरी सुरू करणार आहे.

ivoomi energy electric scooter s1 deliveries from mid june | iVOOMi Energy Electric Scooter : या महिन्यात बाजारात येणार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जवर 100 किमी रेंज

iVOOMi Energy Electric Scooter : या महिन्यात बाजारात येणार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जवर 100 किमी रेंज

googlenewsNext

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी iVOOMi एनर्जी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार आहे. या स्कूटरची डिलिव्हरी कंपनी जूनच्या मध्यापासून सुरू करण्यास असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, या स्कूटरच्या खरेदीसाठी उत्सुक असणाऱ्या लोकांसाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे.

कंपनीने 30 मे पासून आपल्या S1 ई-स्कूटरची बुकिंग सुरू केली आहे आणि जूनच्या मध्यापासून त्याची डिलिव्हरी सुरू करणार आहे. महाराष्ट्रस्थित कंपनीने या वर्षी मार्चमध्ये दोन ई-स्कूटर मॉडेल S1 आणि Jeet बाजारात आणले होते. Jeet ची किंमत 82,990 रुपये आणि Jeet Pro ची किंमत 95,990 रुपये आहे. याचबरोबर,  S1 ची किंमत 84,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, S1 ई-स्कूटर ज्याला इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) कडून मंजुरी मिळाली आहे. या स्कूटरची डिलिव्हरी जूनच्या मध्यापासून केली जाईल.

iVOOMi एनर्जीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय सुनील बन्सल म्हणाले, "आम्हाला खात्री आहे की S1 इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये एक गेम चेंजर ठरेल आणि आम्ही आमच्या सॉलिड-स्टेट इलेक्ट्रिक स्कूटरच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्याची संधी म्हणून पाहतो. जी उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव आणि कार्यक्षमता प्रदान करते."

ताशी 50-54 किलोमीटरचा वेग 
भारतात डिझाइन आणि निर्मिती केलेली  S1 एक 2kW इलेक्ट्रिक मोटरद्वारे संचालित आहे, जी ताशी 50-54 किलोमीटरचा वेग प्रदान करते. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 60V, 2kWh स्वॅपॅबल ली-आयन बॅटरी पॅक आहे, जो खूप कमी वेळेत बॅटरी चार्ज करतो. यामुळे घरात बॅटरी चार्ज करण्याच्या त्रासापासून दिलासा मिळतो.

टेस्ट राइड सुरू
कंपनीच्या म्हणण्यानुसार, पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3-4 तास लागतात आणि एकदा बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली की, ती 100 किमी पर्यंत राइडिंग रेंज देते. कंपनीने सांगितले की, ही इलेक्ट्रिक स्कूटर 28 मे पासून पुणे, नागपूर, गोंदिया, मुंबई, नांदेड, कोल्हापूर, इचलकरंजी, अहमदनगर, सुरत, भावनगर, आदिपूर, कच्छ सारख्या शहरांमधील अनेक टचपॉइंट्सवर टेस्ट राइडसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना 749 रुपयांमध्ये या ई-स्कूटरची टेस्ट राइड प्री-बुक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

Web Title: ivoomi energy electric scooter s1 deliveries from mid june

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.