वाहनविक्रीच्या रेसमध्ये जपानला टाकले मागे; भारताची जगात तिसऱ्या स्थानी झेप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:24 PM2023-01-10T12:24:25+5:302023-01-10T12:26:24+5:30
भारताने वाहनविक्रीत जपानला मागे टाकून जगभरात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.
नवी दिल्ली : भारतात गेल्यावर्षी ४२.५ लाख वाहनांची विक्री झाली. एकूणच २०२२ हे वर्ष वाहन उद्याेगासाठी लाभदायक ठरले. मात्र, या क्षेत्रात एक महत्त्वाची नाेंद झाली. भारताने वाहनविक्रीत जपानला मागे टाकून जगभरात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.
भारतात २०२१ मध्ये युराेमाॅनिटर संस्थेनुसार ८.५% घरांमध्ये किमान एक प्रवासी वाहन हाेते.
वाहन विक्री
४२.५ लाख भारतात
१३% वाढ
४२ लाख जपानमध्ये
५.६% घट
मारुती सुझुकी सर्वात माेठी वाहन उत्पादक कंपनी ठरली.