Jawa 42 Bobber Launched : जावाची नवीन बाईक 42 बॉबर लाँच; जाणून घ्या, किंमतीपासून फीचर्सपर्यंत... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 04:55 PM2022-10-01T16:55:41+5:302022-10-01T16:56:10+5:30

Jawa 42 Bobber : जाणून घ्या, काय आहे या नवीन बाईकची खासियत?

jawa 42 bobber jawa launched new bike 42bobber in india see full details | Jawa 42 Bobber Launched : जावाची नवीन बाईक 42 बॉबर लाँच; जाणून घ्या, किंमतीपासून फीचर्सपर्यंत... 

Jawa 42 Bobber Launched : जावाची नवीन बाईक 42 बॉबर लाँच; जाणून घ्या, किंमतीपासून फीचर्सपर्यंत... 

googlenewsNext

नवी दिल्ली : शक्तिशाली दुचाकी निर्माता कंपनी जावाने आपली नवीन बाईक 42 बॉबर देशात लाँच केली आहे. या बाईकला अनेक फीचर्ससह शानदार लुक देण्यात आला आहे. ही बाईक एकूण तीन कलरमध्ये बाजारात आणली गेली आहे, ज्याच्या किंमतीही वेगवेगळ्या आहेत. याच्या मिस्टिक कॉपर कलरची एक्स-शोरूम किंमत 2.06 लाख रुपये, मून स्टोन व्हाइट कलरची एक्स-शोरूम किंमत 2.07 लाख रुपये आणि जॅस्पर रेडची एक्स-शोरूम किंमत 2.09 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बाईकमध्ये 334cc इंजिन देण्यात आले आहे. यासोबतच यात 2-वे अॅडजस्टेबल सीटही देण्यात आली आहे. जाणून घ्या, काय आहे या नवीन बाईकची खासियत?

Jawa 42 Bobber चे इंजिन
ही बाईक नवीन रेट्रो रोडस्टर स्टाईलमधील आगामी जावा 42 बाईकप्रमाणे डिझाइन करण्यात आली आहे. 42 बॉबरची लो-स्लंग बॉडी आणि सिंगल सीट लुक जावा 42 ची आठवण करून देतो. दोघांचा लूक आणि स्टाइल बर्‍यापैकी सारखा दिसतो. या नवीन बाईकला 334cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे 30.64hp ची कमाल पॉवर आणि 32.64 न्यूटन मीटर कमाल टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हेच इंजिन कंपनीच्या पेराक मॉडेलमध्येही उपलब्ध आहे. या इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

Jawa 42 Bobber चे फीचर्स
जावा 42 बॉबरला मागील बाजूस एक लहान लगेज रॅक, शानदार लूक असलेली नवी सीट, हेडलाइट आणि इन्स्ट्रुमेंटेशन देण्यात आले आहे. तसेच, यामध्ये उत्तम राइडिंगसाठी ABS कॅलिब्रेशनला इंप्रूव्ह करण्यात आले आहे. जावा 42 बॉबरला एक एलसीडी डिस्प्लेसह एलईडी लायटिंग देण्यात आली आहे, तर याचे टेल-लॅम्प पेराकपेक्षा वेगळ्या पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे.

Web Title: jawa 42 bobber jawa launched new bike 42bobber in india see full details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.