आनंद महिंद्रा Royal Enfield ला कडवी टक्कर देणार; Jawa Forty Two लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 03:46 PM2021-02-12T15:46:27+5:302021-02-12T15:47:14+5:30
Jawa Forty Two Motorcycle : सध्याच्या आगामी उत्पादनांत क्लासिक स्पोर्ट्सचा दिमाख अनुभवता येईल. मोटरसायकलचे बाह्य स्वरूप ‘स्पोर्टी क्लासिक’ करण्यात आले आहे.
मुंबई : जावा मोटारसायकल्सने भारतीय बाजारात 2.1 च्या प्रवेशाची घोषणा करत जावा फोर्टी टू परिवारात तीन देखणे सदस्य दाखल केले आहेत. लवकरच डिलरकडे या मोटारसायकल उपलब्ध होतील. 2018 मध्ये सुरू झालेला हा प्रवास जावा 42 या ‘रेट्रो कूल’ क्रांतीला पुढे घेऊन जात आहे. मोटरसायकलची एक्स-शोरूम दिल्ली किंमत रु. 1,83,942 असेल. (Jawa Forty Two 2021 Motorcycle launched)
सध्याच्या आगामी उत्पादनांत क्लासिक स्पोर्ट्सचा दिमाख अनुभवता येईल. मोटरसायकलचे बाह्य स्वरूप ‘स्पोर्टी क्लासिक’ करण्यात आले आहे. ओरीयन रेड, सिरीयस व्हाईट आणि ऑल स्टार ब्लॅक या रंगात उपलब्ध होणार आहे. लांब सीट, सीट पॅन नव्याने डिझाईन करण्यात आले आहे. ट्रीप मीटरदेखील देण्य़ात आले आहे. ट्वीन एक्झॉस्ट, एबीएस देण्यात आले आहेत.
MG Motors च्या ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन लॉन्च; पाहा, किंमत आणि डिटेल्स
इंजिन -
27.33 पीएस उर्जा आणि 27.02 एनएम टॉर्कसह 293 सीसीचे लिक्विड कुल्ड आणि फ्युअल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे.
अॅक्सेसरीज
क्लासिक लिजंड्समध्ये फ्लायस्क्रीन आणि हेडलॅम्प ग्रील देण्यात आले आहेत. तसेच गरजेनुसार सँडलबॅग देण्यात आली आहे. मिक्स अलॉय व्हील्स देखील उपलब्ध करण्यात येणार आहेत.
Benelli ची नवी Imperiale 400 लाँच; सहा महिन्यांतच 10000 नी किंमत घटविली
Benelli India ने भारतात Benelli Imperiale 400 चे नवीन मॉडेल लाँच केले आहे. कंपनीने याची एक्स-शोरुम किंमत 1.89 लाख रुपये ठेवली आहे. महत्वाचे म्हणजे अवघ्या सहा-सात महिन्यांपूर्वीच लाँच केलेल्या मोटरसायकलपेक्षा आताच्या मॉडेलची किंमत 10000 रुपयांनी कमी ठेवली आहे. किंमत कमी करण्यामागे स्थानिक स्तरावर असेम्बलिंग आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याचे कारण आहे. (Benelli has introduced the 2021 Imperiale 400 in the Indian market.)
नव्या गाड्या घ्या, 60 रुपये लीटरने इंधन देतो; देशवासियांना नितीन गडकरींची अजब 'ऑफर'