अखेर तारीख ठरली; पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Jawa Yezdi ची नवीन दमदार बाईक...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 06:42 PM2024-08-30T18:42:53+5:302024-08-30T18:44:00+5:30
Jawa Yezdi Bikes : अनेक दिवसांपासून या बाईकची चर्चा सुरू आहे.
Jawa Yezdi Bikes : लोकप्रिय टू-व्हिलर कंपनी Jawa Yezdi भारतीय बाजारपेठेत लवकरच आपली नवीन बाईक लॉन्च करणार आहे. कंपनीने बाईकचे नाव सांगितले नाही, पण ही बाईक Java 42 असल्याची दाट शक्यता आहे. कंपनीने लॉन्चिंगची तारीखही सांगितली आहे. 3 सप्टेंबर 2024 रोजी ही बाईक लॉन्च केली जाईल. कंपनीने अद्याप बाईकचे फीचर्स सांगितले नाही, परंतु काही लीक समोर आले आहेत.
कंपनीने टीझर रिलीज केला
कंपनीकडून एक टीझर जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये बाइकची झलक दाखवण्यात आली आहे. ही नवीन बाईक रोडस्टरसारखी दिसते. बाईकचे डिझाईन पूर्णपणे नवीन आहे. बाईक नेमकी कशी असेल, हे 3 सप्टेंबरलाच पाहायला मिळेल. ही नवीन बाईक Jawa 42 असण्याची दाट शक्यता आहे.
Hold on to your helmets, because the next chapter is nearly here. The ultimate answer you’ve been waiting for is coming soon. 03.09.2024 #JawaMotorcycles#StayTuned#TheJawaLifepic.twitter.com/9GvHNLIy3z
— Jawa Motorcycles (@jawamotorcycles) August 27, 2024
टीझरनुसार बाईकला नवीन इंधन टाकी मिळेल, ज्यामध्ये इंधन भरण्याची कॅप इतर बाइकच्या तुलनेत थोडी वेगळी असू शकते. याशिवाय, हेडलाइट्सच्या आजूबाजूला नवीन शैलीतील काउलिंग दिसत आहे.
पॉवरट्रेन काय असेल?
पॉवरट्रेनबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, परंतु असे मानले जाते की, या बाइकमध्ये 334 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन मिळू शकते, जे जास्तीत जास्त 22.26 बीएचपी पॉवर आणि 28.1 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करेल. दरम्यान, बाईकची किंमत किती असेल, हे लॉन्चिंगच्या दिवशीच समोर येईल.