Jeep Compass : 2000cc इंजिन असलेली SUV लाँच; 4X4 चे देखील फीचर, जाणून घ्या किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 08:39 PM2022-08-10T20:39:28+5:302022-08-10T20:40:18+5:30
Jeep Compass : कंपनीने आपल्या लोकप्रिय SUV जीप कंपासची 5 वी एनिव्हर्सरी एडिशन (Jeep Compass 5th Anniversary Edition) लॉन्च केली आहे.
नवी दिल्ली : जीप इंडिया देशात पाच वर्षे पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने, कंपनीने आपल्या लोकप्रिय SUV जीप कंपासची 5 वी एनिव्हर्सरी एडिशन (Jeep Compass 5th Anniversary Edition) लॉन्च केली आहे. यामध्ये एक स्टँडर्ड मॉडेलपेक्षा वेगळे बनवण्यासाठी अनेक अतिरिक्त फीचर्स देण्यात आली आहेत.
यामध्ये 5 वी एनिव्हर्सरी बॅजिंग आणि व्हीलला नवा रंग देण्यात आला आहे. या कारला 2000 cc चे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. फीचर्सच्या रूपात, 10.2-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 6 एअरबॅग्ज, 4X4 सुविधा मिळते. कंपनीने एसयूव्हीची बुकिंग सुरू केली असून, लवकरच या कारची किंमत जाहीर केली जाईल.
कंपासच्या एनिव्हर्सरी एडिशनमध्ये ग्रॅनाइट क्रिस्टल फिनिशसह 18-इंच अलॉय व्हील देण्यात आले आहेत. यात न्यूट्रल ग्रे अॅक्सेंट बॅजिंगसह मिरर आणि न्यूट्रल ग्रे रिंगसह नवीन ग्लॉस ब्लॅक ग्रिल देखील मिळतो. 5 व्या एनिव्हर्सरीचे बॅजिंग आत आणि बाहेरही पाहिले जाऊ शकते. आतील लेदर सीटला हलके टंगस्टन अॅक्सेंट स्टिचिंग मिळते.
इंटीरिअर आणि फीचर्स
5 व्या एनिव्हर्सरी एडिशन कंपास टॉप व्हेरिएंटवर आधारित नाही, तरीही त्यामध्ये फीचर्सची एक लांबलचक लिस्ट आहे. ड्युअल-पॅनोरामिक सनरूफ, ऑटो एलईडी हेडलॅम्प, 10.1-इंचाचा इन्फोटेनमेंट टचस्क्रीन डिस्प्ले, 7-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले, पॉवर्ड टेलगेट यांसारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत. मात्र, यात पॉवर्ड फ्रंट पॅसेंजर सीट, 10.2-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 360-डिग्री व्ह्यू कॅमेरा यासारख्या फिचर्सचा अभाव आहे.
इंजिन आणि ट्रांसमिशन
जीप पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनसह कंपास ऑफर करत आहे. 1.4-लिटर टर्बो-पेट्रोल 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोशी जोडलेले आहे, तर 2-लीटर डिझेलला 6-स्पीड मॅन्युअल मिळते. 9-स्पीड ऑटोमॅटिक वापरून डिझेल इंजिन 4WD सह देखील दिले जाते. CarDekho रिपोर्टनुसार, या एसयूव्हीची किंमत 25.24 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 28.24 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.