Joy e-Bikes: दुर्लक्षित राहिली! पण देशात सर्वाधिक इलेक्ट्रीक टू व्हीलर या कंपनीकडे; किंमत कमी, विक्री 2900% वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 02:12 PM2022-02-04T14:12:29+5:302022-02-04T14:12:53+5:30
WardWizard Innovations & Mobility Joy e-Bikes: गेल्या काही महिन्यांवर नजर टाकली तर लोकांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटरसायकलची क्रेझ वाढली आहे. Ola इलेक्ट्रिक आणि Ather Energy सारख्या कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे, तर Hero MotoCorp आणि Royal Enfield सारख्या बाईकच्या विक्रीत घट होत आहे.
इलेक्ट्रीक स्कूटर आणि इलेक्ट्रीक मोटरसायकल बनविणारी ही कंपनी ओला, सिंपल वन, हिरो, बजाजच्या प्रसिद्धीमुळे काहीशी दूर राहिली आहे. परंतू, इलेक्ट्रीक वाहने याच कंपनीकडे सर्वाधिक आहेत. कमी किंमत आणि एकसोएक धासू लुकच्या स्कूटर, बाईकनी ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. WardWizard Innovations & Mobility ही कंपनी तुम्हाला माहिती नसेलही, परंतू ती ज्या ब्रँडनेमने स्कूटर विकते ते कदाचित तुम्ही पाहिले असतील. या कंपनीने एका वर्षाच्या आत 2900% टक्क्यांनी विक्रीमध्ये वाढ नोंदविली आहे.
Joy e-Bikes चे नाव तुम्ही ऐकला असाल किंवा पाहिला असाल, हा ब्रँड वार्डविझार्ड कंपनीचा आहे. एकट्या जानेवारीत या कंपनीने 3,951 इलेक्ट्रीक स्कूटर विकल्या आहेत. गेल्या वर्षी या कंपनीने 129 स्कूटर विकल्या होत्या. अशाप्रकारे कंपनीने वर्षभरात 2,963% वाढ नोंदविली आहे.
२०२१-२२ मध्ये आतापर्यंत 21,327 इलेक्ट्रीक स्कूटर, मोटरसायकल विकल्या आहेत. या कंपनीचे Joy e-Bikes Wolf+, Gen Next Nanu+, Skyline, Hurricane मॉडेल्स खूप प्रसिद्ध आहेत. कंपनीचे थोडे थोडके नाहीत तर 11 इलेक्ट्रीक स्कूटर आणि बाईक मॉडेल आहेत.
गेल्या काही महिन्यांवर नजर टाकली तर लोकांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटरसायकलची क्रेझ वाढली आहे. Ola इलेक्ट्रिक आणि Ather Energy सारख्या कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे, तर Hero MotoCorp आणि Royal Enfield सारख्या बाईकच्या विक्रीत घट होत आहे.