स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 06:00 PM2024-12-02T18:00:59+5:302024-12-02T18:01:32+5:30
जेएसडब्ल्यू ग्रुप हा आता टाटा आणि महिंद्रासारख्या कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहे.
स्टील मार्केटमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर आता जेएसडब्ल्यू ग्रुप म्हणजेच जिंदाल स्टील वर्क्स आता इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये उतरणार आहे. सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू ग्रुपने काही महिन्यांपूर्वी एमजी मोटर इंडियामध्ये जवळपास 1500 कोटी डॉलरची गुंतवणूक केली होती आणि एमजी ब्रँडची मालकी असलेल्या चीनच्या SAIC Motor सह जॉइंट व्हेंचर बनवले होते.
जेएसडब्ल्यू ग्रुप हा आता टाटा आणि महिंद्रासारख्या कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, जेएसडब्ल्यू ग्रुप आता स्वतःचा ईव्ही ब्रँड लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. टाटा आणि महिंद्रा या भारतातील कंपन्या आहेत, ज्या पूर्णपणे होम ग्रोन ईव्ही ब्रँड आहेत. आता जेएसडब्ल्यू ग्रुप देखील ईव्हीच्या स्पर्धेत उतरणार आहे.
ईटीच्या एका रिपोर्टनुसार, सज्जन जिंदाल यांचे म्हणणे आहे की, त्यांना भारतात फक्त चीनी कंपनीचे (एमजी मोटर) विक्रेता म्हणून राहायचे नाही. त्यापेक्षा त्यांना भारतातच प्रोडक्ट बनवून व्हॅल्यू एडिशन करायचे आहे. तसेच, कंपनीने तयार केलेल्या कार भारतात विकायच्या आहेत.
दरम्यान, एमजी मोटर हा ब्रिटीश ब्रँड आहे, परंतु आज तो चीनच्या SAIC Motor च्या मालकीची आहे, जी चीनची सरकारी ऑटोमोबाईल कंपनी आहे. काही महिन्यांपूर्वी जिंदाल ग्रुपने एमजी मोटर इंडियामध्ये 35 टक्के हिस्सा खरेदी करून जॉइंट व्हेंचर बनवले होते. या जॉइंट व्हेंचरची पहिली कार MG Windsor EV भारतात लाँच झाली आहे आणि ती Tata Nexon EV ला टक्कर देत आहे.
ईव्ही आणि कमर्शियल व्हीकल प्लांटची घोषणा
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे एक प्लांट उभारला जाणार आहे. हा प्लांट पूर्णपणे ईव्हीवर केंद्रित असणार आहे, असे सज्जन जिंदाल यांनी सांगितले. दरम्यान, ऑक्टोबरमध्येच जेएसडब्ल्यू ग्रुपने औरंगाबादमध्ये 27,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करून ईव्ही आणि कमर्शियल व्हीकल प्लांटची घोषणा केली होती. कंपनीच्या या प्लांटमुळे जवळपास 5,200 लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.