फक्त १० रुपयांची टूथपेस्ट तुमची कार, बाईक करणार चकचकीत...; पहा कशी ती...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 11:40 AM2024-12-04T11:40:43+5:302024-12-04T11:41:32+5:30
Bike care Tips: दर आठवड्याला महागडी पॉलिश करत बसायची गरज नाही. यासाठी २०० ते ५०० रुपयांचा खर्च येतो. हा खर्च अवघा १० रुपये आला तर, विचार करा किती पैसे दोन ते पाच लीटर पेट्रोलचे पैसे वाचतील आणि त्यात तुमचा आठवडा जाईल
जर तुम्हाला तुमची बाईक इतरांपेक्षा चकचकीत करायची, चमकवायची असेल तर दर आठवड्याला महागडी पॉलिश करत बसायची गरज नाही. यासाठी २०० ते ५०० रुपयांचा खर्च येतो. हा खर्च अवघा १० रुपये आला तर, विचार करा किती पैसे दोन ते पाच लीटर पेट्रोलचे पैसे वाचतील आणि त्यात तुमचा आठवडा जाईल, नाही का....
या १० रुपयांच्या पॉलिशसाठी तुम्हाला कुठे सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरीच हे करू शकता. १० रुपयांची टुथपेस्टची ट्यूब तुमचे काम करणार आहे. टुथपेस्टमध्ये हलके घर्षणकरणारे गुण असतात. टुथपेस्ट ही इतर औषधांच्या क्रीमपमाणे खूपच पातळ नसते, तर त्यात लहान लहान कण असतात. जे बाईकच्या पृष्ठभागावर असलेली घाण, स्क्रॅच आणि ऑक्सिडेशन हटविण्यासाठी मदत करणारे ठरतात.
ते कसे वापरावे ते पाहुया....
- यासाठी तुम्हाला पांढरी टुथपेस्ट, मुलायम कपडा आणि पाणी लागणार आहे. आधी बाईकची स्वच्छता करून घ्या.
- छोडी टुथपेस्ट घ्या आणि हलक्या हाताने स्क्रॅच किंवा मॅटसारखे दिसणाऱ्या भागावर लावा.
- मायक्रोफायबरच्या कापडाने तो भाग गोल गोल आकारात चोळा. असे केल्याने डाग, हलके स्क्रॅच हटविण्यास मदत होईल.
- यानंतर स्वच्छ ओल्या फडक्याने पुसून घ्या. यानंतर सुक्या कापडाने पुसून चमकवा.