Kabira Mobility Intercity Aeolus ची रेंज 110 किमी; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 01:28 PM2022-10-20T13:28:03+5:302022-10-20T13:43:44+5:30
Kabira Mobility Intercity Aeolus : कबीरा मोबिलिटीने ही स्कूटर 71,490 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) बाजारात आणली आहे.
नवी दिल्ली : इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदी करण्याचा विचार असाल तर तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये जास्त रेंजचा एक पर्याय आहे. हा म्हणजे कबीरा मोबिलिटी इंटरसिटी एओलस ( Kabira Mobility Intercity Aeolus). कमी बजेटमध्ये जास्त रेंज असलेली ही एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे. आम्ही तुम्हाला या स्कूटरची किंमत सांगू तसेच तुम्हाला स्कूटरमधील बॅटरी पॅक, रेंज, टॉप स्पीड, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल माहिती सांगू जेणेकरून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना कोणती अडचण येणार नाही.
कबीरा मोबिलिटीने ही स्कूटर 71,490 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) बाजारात आणली आहे. ऑनरोड ही किंमत 84,615 रुपये होते. या स्कूटरमध्ये 60V, 35Ah क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक आहे. या बॅटरीसोबत 250W पॉवर आउटपुट असलेली BLDC मोटर जोडलेली आहे. बॅटरीच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर ही बॅटरी 4 ते 6 तासांत फूल चार्ज होते. कंपनी या बॅटरी पॅकवर 3 वर्षांची वॉरंटी आणि मोटरवर 1 वर्षाची वॉरंटी देखील देत आहे.
स्कूटरची रेंज...
स्कूटरच्या रेंजबद्दल, कबीरा मोबिलिटीचा दावा आहे की एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 110 किमीची रेंज देते. या रेंजसह 24 kmph चा टॉप स्पीड मिळतो. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरच्या पुढील आणि मागील दोन्ही व्हीलमध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन बसवले आहे, ज्यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम जोडण्यात आली आहे. सस्पेन्शन सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर समोर स्प्रिंग-लोडेड सस्पेन्शन आणि मागील बाजूस स्प्रिंग-आधारित शॉक ऍब्जॉर्बर सिस्टीम देण्यात आली आहे.
स्कूटरमधील फीचर्स...
फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये चार्जिंग पॉइंट, फास्ट चार्जिंग, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, रिमोट स्टार्ट, पुश बटण स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, जिओ फेन्सिंग, लाइव्ह ट्रॅकिंग, अँटी थेफ्ट आणि एसओएस, ट्रिप हिस्ट्री, राइड स्टॅटिक्स, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत.