Kabira Mobility नं लाँच केली सर्वात वेगवान कमर्शिअल Electric Scooter; पाहा काय आहे विशेष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 02:20 PM2021-04-14T14:20:47+5:302021-04-14T14:22:57+5:30
Kabira Mobility ही गोव्यातील एक स्टार्टअप कंपनी आहे. कंपनीनं लाँच केली सर्वात वेगवान इलेक्ट्रीक कमर्शिअल स्कूटर
गोवा आधारित स्टार्ट अप कंपनी Kabira Mobility नं आपली नवीन हाय-स्पीड कमर्शियल डिलिव्हरी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. या नवीन स्कूटरला कंपनीने Hermes 75 असं नाव दिलं आहे. आकर्षक लूक आणि जबरदस्त इलेक्ट्रिक मोटर असलेल्या स्कूटरच्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 89,600 रुपये (एक्स-शोरूम, गोवा) इतकी ठेवण्यात आली आहे.
ही नवीन इलेक्ट्रीक स्कूटर खास करून कमर्शिअल डिलिव्हरीसाठी डिझाईन केली गेली असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. Hermes 75 स्कूटरमध्ये फिक्स आणि स्वॅपैबल दोन्ही प्रकारच्या बॅटरीचा पर्याय मिळतो. एकीकडे फिक्स्ड बॅटरी सिंगल चार्जमध्ये १०० किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेज देते. तर दुसरीकेड स्वॅपेबल बॅटरी सिंगल चार्जमध्ये १२० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते.
सर्वात वेगवान स्कूटर
या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये 2.4Kw आणि 40AH क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे. ही बॅटरी केवळ ४ तासांत पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते. यात देण्यात आलेली इलेक्ट्रीक मोटर 4000W पीक पॉवर जनरेट करते. त्याच्या मदतीनं ही स्कूटर 80 किलोमीटर प्रति तास वेगानं जाण्यास सक्षम आहे. ही देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रीक कमर्शिअल स्कूटर आहे.
कंपनीनं यात 12 इंचाचे टायर्स दिले आहेत. तसंच यात ड्युअल डिस्क ब्रेकिंग सिस्टमही आहे. याशिवाय यात मोबाईल अॅप कनेक्टिव्हीटी, स्वॅपेबल बॅटरी, डिजिटल डॅशबोर्डसारखे फीचर्सही आहेत. या स्कूटरवरून 150 किलोपर्यंत सामान वाहून नेता येतं. तसंच यावर कार्गो स्टोरेज बॉक्सही लावण्यात आला आहे. ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही स्कूटर खरेदी करता येऊ शकते. तसंच अधिकृत डिलरशीपकडेही जून महिन्यापासून ही स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध असेल.