कावासाकीची 800cc इंजिन असणारी बाईक; लवकरच येणार बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 09:00 AM2019-07-31T09:00:24+5:302019-07-31T12:32:18+5:30

कावासाकीचे बाजारपेठेत आगमन झाल्याने या बाईकची स्पर्धा थेट रॉयल एनफील्ड Interceptor आणि Triumph Street Twin सोबत होणार आहे.

Kawasaki bike with 800cc engine; Coming soon to the market | कावासाकीची 800cc इंजिन असणारी बाईक; लवकरच येणार बाजारात

कावासाकीची 800cc इंजिन असणारी बाईक; लवकरच येणार बाजारात

Next

मुंबई : कावासाकीने (Kawasaki) भारतात नवीन बाईक W800 लाँच केली असून या बाईकची भारतात एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये असणार आहे. त्याचप्रमाणे आगामी ऑगस्टपासूनच या बाईकच्या विक्रिला सुरुवात होणार आहे. कावासाकीचे बाजारपेठेत आगमन झाल्याने या बाईकची स्पर्धा थेट रॉयल एनफील्ड Interceptor आणि Triumph Street Twin सोबत होणार आहे.

कावासाकी W800 मध्ये 773cc, एअरकूल्ड, फ्यूअल-इंजेक्टेड इंजिन लावण्यात आले आहे. यामुळे बाईकला 47.5hp ची पॉवर आणि 62.9Nm टॉर्क मिळतो. तसेच गाडीचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सचे असून बाईकच्या समोरच्या बाजूला 320mm डिस्क आणि रिअरमध्ये 270mm डिस्क आहे. सुरक्षेसाठी या गाडीत एलईडी हेडलाईट, स्लिपर क्लच आणि ड्यूअल चॅनल ABS फिचर देखील देण्यात आले आहेत. रेट्रो स्टाईलच्या बाईकमध्ये येणारे सर्व फिचर या बाईकमध्ये आहे. 

कंपनीने या बाईकचा केवळ स्ट्रीट व्हेरिअंट लाँच केला आहे. तसेच लवकरच याचा कॅफे व्हेरिअंट देखील लाँच होणार असल्याचे कंपनीने सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात कावासाकी W800 स्ट्रीट आणि कॅफे रेसर व्हिरिअंटमध्ये उपलब्ध आहे. कावासाकीने ही बाईक ग्लोबल युरो 4 इमिशनचे नियम पाळत नसल्याने 2016 मध्ये या बाईकची निर्मिती बंद केली होती. त्यानंतर 2018 मध्ये ही बाईक रिलाँच करण्यात आली होती.

Web Title: Kawasaki bike with 800cc engine; Coming soon to the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.