Kawasaki लवकरच दोन इलेक्ट्रिक बाईक्स लाँच करणार, EICMA शोमध्ये पहिल्यांदा दिसल्या होत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 05:19 PM2023-08-04T17:19:26+5:302023-08-04T17:20:14+5:30
कावासाकीने गेल्या वर्षी मिलानमधील EICMA शोमध्ये दोन इलेक्ट्रिक बाईक्सचे सादर केल्या होत्या. आता रिपोर्ट्सनुसार, दोन्ही इलेक्ट्रिक बाईक्स लाँचसाठी तयार आहेत.
नवी दिल्ली : कावासाकी (Kawasaki) लवकरच आपल्या दोन इलेक्ट्रिक बाईक्स लाँच करण्यासाठी तयार आहे. दुसरीकडे, रॉयल एनफिल्ड देखील इलेक्ट्रिक बाईकच्या दिशेने वेगाने काम करत आहे. कावासाकीने गेल्या वर्षी मिलानमधील EICMA शोमध्ये दोन इलेक्ट्रिक बाईक्सचे सादर केल्या होत्या. आता रिपोर्ट्सनुसार, दोन्ही इलेक्ट्रिक बाईक्स लाँचसाठी तयार आहेत.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जपानी ब्रँडच्या इलेक्ट्रिक बाईक्सच्या जोडीने ऑस्ट्रेलियामध्ये आपली होमोलॉगेशन प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे असे दिसून येते की, कावासाकी ई-बाईक मिळवणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असू शकते. होमोलॉगेशन फाइलिंगमध्ये दोन बाईक्सना निन्जा ई-1 आणि झेड ई-1 अशी नावे देण्यात आली आहेत.
दोन्ही इलेक्ट्रिक बाईक्सचे बॉडीवर्क ब्रँडच्या 400 सीसी समकक्ष, निन्जा 400 आणि Z400 सारखे आहे असे म्हटले जाते. गेल्या वर्षी दाखवलेला प्रोटोटाइप सुमारे 15 bhp पॉवर जनरेट करतो. Z e-1 चे वजन सुमारे 135 किलो असू शकते, तर निन्जा e-1 चे वजन 140 किलो असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन्ही ई-बाईक्स रिमूव्हेबल बॅटरीसह येतील की नाही हे कावासाकीने अद्याप उघड केलेले नाही. मात्र, याआधी आलेल्या रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या आगामी इलेक्ट्रिक बाईक्समध्ये दोन रिमूव्हेबल बॅटरी पॅक दिले जाऊ शकते. प्रत्येकाचे वजन 12 किलो असेल आणि त्याचे एकत्रित उत्पादन 3 kWh असेल. जर असे झाले तर दोन्ही इलेक्ट्रिक बाईक्स उत्कृष्ट रेंज आणि शानदार टॉप स्पीडसह येऊ शकतात. तसेच, लाँच झाल्यानंतर, ही ब्रँडची पहिली मास-मार्केट इलेक्ट्रिक स्ट्रीट बाईक असणार आहे.