बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 07:21 PM2024-11-28T19:21:59+5:302024-11-28T19:22:08+5:30

जर तुम्ही नेहमी १००-२०० रुपयांचे पेट्रोल भरून बाईक, स्कूटर चालवत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. 

Keep bike tank full, get more mileage...! Was it really like that? Do you also pay only 100-200 rs for fuel... | बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...

बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...

दुचाकीची इंधनाची टाकी फुल ठेवल्याने मायलेज जास्त मिळते, असे सांगितले जात आहे. इंधनाची टाकी फुल ठेवण्याचे काही फायदे आहेत. यामुळे तुमच्या बाईकचा परफॉर्मन्स सुधारतो आणि पैसेही वाचतात. जर तुम्ही नेहमी १००-२०० रुपयांचे पेट्रोल भरून बाईक, स्कूटर चालवत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. 

जेव्हा इंधनाची टाकी फुल असते तेव्हा इंजिनात इंधनाचा दबाव स्थिर असतो. यामुळे इंजिन चांगल्या प्रकारे दाकद देण्याचे काम करते. यामुळे मायलेज देखील चांगले मिळू शकते. परंतू जेव्हा तुम्ही १००-२०० रुपये देत पेट्रोल भरता तेव्हा तुमच्या इंधनाची टाकी अर्धीच भरलेली असते. यामुळे फ्युअल पंपला टाकीतील इंधन सारखे सारखे इंधन ओढून घेण्यासाठी झगडावे लागते. यामुळे इंजिनाला योग्य प्रमाणात इंधन मिळत नाही व चांगल्या प्रकारे काम करत नाही. यामुळे ती ताकद मिळविण्यासाठी जास्त इंधन जाळले जाऊ शकते. 

टाकी फुल असेल तर फ्युअल पंप थंड आणि लुब्रिकेटेडज राहतो. कमी इंधन असेल तर गरम होईल आणि त्याची क्षमताही कमी होत जाईल. कमी इंधन असेल तर हवेतील पाण्याच्या अंशातून इथेनॉल असल्याने टाकीत पाण्याचे थेंब तयार होण्याची जास्त शक्यता असते. 

टाकी फुल करण्याचे काही तोटेही आहेत. उन्हाळ्यात टाकी फुल करू नये. ती ९०-९५ टक्केच भरावी. नाहीतर हे इंधन वायाही जाऊ शकते किंवा काही अघटीत घटनाही घडू शकते. 

Web Title: Keep bike tank full, get more mileage...! Was it really like that? Do you also pay only 100-200 rs for fuel...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.