चांगल्या मायलेजसाठी स्कूटरचा वेग ठेवा संतुलित व स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 07:00 AM2017-09-02T07:00:00+5:302017-09-02T07:00:00+5:30
जेव्हा भारतामध्ये या प्रकारच्या ट्युब्युलर चासीच्या स्कूटरचे हे पर्व सुरू झाले व त्यानंतर हाताने गीयर टाकण्याच्या पत्राशीट जोडून तयार केलेल्या टु स्ट्रोक स्कूटर कालबाह्य झाल्या.
सध्याच्या स्कूटर्स वजनाला हलक्या, फोर स्ट्रोक, ऑटोगीयरच्या आहेत. जेव्हा भारतामध्ये या प्रकारच्या ट्युब्युलर चासीच्या स्कूटरचे हे पर्व सुरू झाले व त्यानंतर हाताने गीयर टाकण्याच्या पत्राशीट जोडून तयार केलेल्या टु स्ट्रोक स्कूटर कालबाह्य झाल्या. वास्तविक नव्या स्कूटर्स चालवायला व हाताळायला सोप्या असल्याने महिलांनाही त्या सुविधाजनक वाटल्याने अशा स्कूटर्सचे राज्य आता सुरू झाले आहे. मोपेड्सचा जमानाही संपला. पण हे करीत असताना मायलेजबाबत मात्र सध्याच्या या नव्या पद्धतीच्या स्कूटर्स पूर्णपणे निराशा करणाऱ्या आहेत. कागदोपत्री कंपनीने सांगितलेले मायलेज मिळत नाही. लांबच्या पलल्यामध्ये ते मिळेल असे वाटते पण ते ही तितके चागले मिळत आहे असे दिसत नाही. यामुळे प्रश्न असा पडतो की इतकी किंमत मोजूनही केवळ आवश्यक आहे म्हणून अशा कमी मायलेज देणाऱ्या या स्कूटर्स का वापराव्यात?
स्कूटर्स मायलेज देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या स्कूटर्स वजनाला हलक्या करूनही मायलेज कमी देतात. पण मुळात सलगपणे मोकळ्या व सपाट रस्त्यावर ताशी ४० ते ४५ कि.मी. वेग राखून त्या चालवल्या तर मायलेज मिळते. मग शहर वा गावात या स्कूटर्सचे मायलेज मिळत नाही. त्यामुळे अनेक जण केवळ नाईलाज म्हणून स्कूटर वापरतात. खरे म्हणजे सलग किमान दहा कि.मी. स्कूटर चालवली गेली तर मायलेज किती हे तपासणे ठीक आहे, कमी रनिंग होत असेल तर मायलेज मिळणे कठीण आहे.
शहरात सिग्नलला स्कूटरचे इंजिन बंद करणे, पुलावरून उतरताना एक्सलरेटर विनाकारण देऊ नये. स्कूटरचा वेगही हळू हळू वाढवणे व किमान वेग ताशी ४० ते ४५ कि.मी. पेक्षा न ठेवणे, स्कूटर ही रेसिंगचे साधन नाही, पीकअप चांगला असला म्हणजे सतत त्याच पीक अप घेऊन चालवण्याचा अट्टाहास करू नये. अति वजन व जास्त सीट घेणे हे देखील स्कूटरच्या शहरी मायलेजला कमी करणारे आहे. तेव्हा स्कूटर किफायती कशी ठरेल हे तुमच्या ड्रायव्हिंगवर अवलंबून आहे.