Kia Motors ने लाँच केली पहिली इलेक्ट्रीक सेदान; एका चार्जिंगमध्ये 475 km रेंज, थंडीत 600 किमीही जाते

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 02:14 PM2021-08-05T14:14:07+5:302021-08-05T14:14:56+5:30

Kia Motors Electric car: किया मोटर्सने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ईव्ही इलेक्ट्रीक सेदान लाँच केली आहे. ही कार दोन बॅटरी पॅकमध्ये उपलब्ध आहे. 

Kia EV6 Sedan With 475 Km Range Launched at $40,000; two battery pack available | Kia Motors ने लाँच केली पहिली इलेक्ट्रीक सेदान; एका चार्जिंगमध्ये 475 km रेंज, थंडीत 600 किमीही जाते

Kia Motors ने लाँच केली पहिली इलेक्ट्रीक सेदान; एका चार्जिंगमध्ये 475 km रेंज, थंडीत 600 किमीही जाते

googlenewsNext

दक्षिण कोरियाची प्रमुख वाहन निर्माता कंपनी किया मोटर्सने (Kia Motors) आपली इलेक्ट्रीक सेदान (Electric sedan) कार किया ईव्ही6 लाँच केली आहे. कंपनीनुसार या कारला लाँच नंतर चांगली मागणी आहे. कियाने या कारला ई जीएमपीवर तयार केले आहे. हा ह्युंदाई मोटर्स ग्रुपचा एक एकत्रित प्लॅटफॉर्म आहे. कंपीनीने सांगितले की, दक्षिण कोरियामध्ये या कारला 30 हजार आगाऊ बुकिंग मिळाल्या आहेत. (The Kia EV6 is available with two kinds of battery packs -- a standard 58-kilowatt-hour (kWh) battery pack and a long-range 77.4-kWh one.)

Nitin Gadkari: नितीन गडकरींना कंपन्यांपेक्षा कार मालकांची चिंता; म्हणाले, 'सहा एअरबॅग द्या', पण...

याशिवाय या कारला युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये 8,800 प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत. यामुळे किया मोटरने सुरुवातीला कोरियामध्ये 13 हजार आणि परदेशांमध्ये 17 हजार युनिट विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. किया ईव्ही 6 इलेक्ट्रीक कारची कोरियातील किंमत 40,800 डॉलर पासून सुरु होते. तर टॉप मॉडेलची किंमत 49,500 डॉलर वर जाते. सरकारकडून या ईलेक्ट्रीक कारवर खूप सबसिडी दिली जात आहे. यामुळे कारची किंमत खूप कमी होते. 

MG Motor: जबरदस्त डिझाईन! पहिल्या कनेक्टेड कारवाल्या कंपनीची दुसरी एसयुव्ही येतेय; भाव खाणार

किया मोटर्सने या ईव्हीमध्ये दोन बॅटरी पॅक दिले आहेत. यातील पहिली बॅटरी स्टँडर्ड आहे. जीची क्षमता 58 किलोवॉट आहे. तर दुसरी बॅटरी 77.4 किलोवॉट आहे. यामुळे या कारची रेंजदेखील मोठी आहे. 58 किलोवॉटच्या बॅटरीद्वारे ही कार 370 किमीची रेंज देते. तसेच दुसऱ्या बॅटरी पॅकवर ही कार 475 किमी धावते. या कारचा वेग हा देखील भन्नाट आहे. कंपनीच्या दाव्यानुसार कार 5.2 सेकंदांत 100 किमी प्रती तास वेग पकडते.

EV घेणाऱ्यांसाठी गडकरींच्या मंत्रालयाकडून मोठी खूशखबर; केंद्राने दिली सूट, आणखी पैसे वाचणार

भारतातील ऑटो सेक्टरमध्ये मोठे नाव असलेल्या दक्षिण कोरियाच्या ह्युंदाईने आपली दुसरी इलेक्ट्रीक कार प्रदर्शित केली आहे. या कारचे नाव Ioniq 5 असून कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारात अन्य काही कारचे प्रदर्शन केले आहे. ह्युंदाईच्या या Ioniq 5 ही हायड्रोजन फ्युअल सेल असलेली एसयुव्ही आहे. या कारला जागतिक स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही कार टेस्लाच्या मॉडेल ३ ला कडवी टक्कर देताना दिसत आहे. ह्युंदाईने या कारमध्ये 72.6 किलोवॉट क्षनतेचे बॅटरी पॅक दिले आहे. या बॅटरीवर कंपनीने असा दावा केला आहे की, एकदा फुल चार्ज झाली की 480 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. याचसोबत कारचा टॉप स्पीड हा 185 किमी प्रति तास आहे.

Anand Mahindra टेन्शनमध्ये; प्रिमियम एसयुव्ही XUV700 लाँचिंगआधीच झाली ट्रोल, लोकांना नापसंद

Web Title: Kia EV6 Sedan With 475 Km Range Launched at $40,000; two battery pack available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.