कियाची ईव्ही 6 आता रस्त्यावर धावणार; या तारखेपासून बुकिंग सुरु करण्याची केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 03:19 PM2023-04-05T15:19:34+5:302023-04-05T15:19:59+5:30
गेल्या वर्षी जून 2022 मध्ये EV6 भारतात लाँच केली होती. ही कार कियाने फक्त 432 ग्राहकांनाच विकली होती.
किआने गेल्या वर्षी जून 2022 मध्ये EV6 भारतात लाँच केली होती. ही कार कियाने फक्त 432 ग्राहकांनाच विकली होती. अखेर कियाने भारतातील पहिल्या ईलेक्ट्रीक कारची बुकिंग सुरु करण्याची घोषणा केली आहे.
लॉन्चच्या वेळी 12 शहरांमधील 15 निवडक डीलरशिपमधून 44 शहरांमधील 60 आउटलेट्सपर्यंत EV डीलर फूटप्रिंटचा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. किआ इंडिया ची 150 kW चे हाय-स्पीड चार्जर नेटवर्क सध्याच्या 15 डीलरशिपवरून सर्व 60 आउटलेट्सपर्यंत विस्तारण्याची योजना आहे. EV6 दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: GT Line आणि GT Line AWD ची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 60.95 लाख रुपये आणि 65.95 लाख रुपये आहे.
कियाच्या या ईलेक्ट्रीक कारचे बुकिंग १५ एप्रिलपासून सुरु करण्यात येणार आहे. स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित असलेल्या EV6 च्या आतील बाजूसही बऱ्यापैकी जागा देण्यात आली आहे. जबरदस्त लूक्स आणि चार रंगात कार उपलब्ध करुन देण्यात आली आहे. EV6 मध्ये दोन १२.३ इंचाच्या टचस्क्रिन इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि इन्फोटेन्मेंट सिस्टम उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इलेक्ट्रीक सनरुफ, ADAS तंत्रज्ञान, १४ स्पीकर, कनेक्टेट कार टेक आणि बरेच फिचर्स कारमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
कारमध्ये ८ एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. तसंच फॉरवर्ड कोलेजन असिस्ट, अॅडप्टीव्ह क्रूझ कंट्रोलचेही फिचर देण्यात आले आहेत. EV6 कारचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही कार सिंग चार्जवर तब्बल ५२८ किमीची रेंज देऊ शकते असा दावा कंपनीनं केलं आहे. कारमध्ये 77.4kWh बॅटरी युनिट देण्यात आलं आहे. चार्जिंगबाबत बोलायचं झालं तर 50kW चार्जरनं कार ७३ मिनिटांत १० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. 350kW क्षमतेची चार्जिंग सुविधा उपलब्ध असेल तर कार अवघ्या १८ मिनिटांत फुल चार्ज होऊ शकणार आहे.