Kia Carens MPV Teaser Launch: कियाच्या सात सीटर एमपीव्हीचा टीझर लाँच; Kia Carens येतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 07:05 PM2021-12-01T19:05:30+5:302021-12-01T19:06:24+5:30
Kia Carens MPV Teaser launch: कियाची एमपीव्ही कॅटेगरीमध्ये पहिली कार असणार आहे. कियाची ही नवी कार मारुती सुझुकीच्या अर्टिगा आणि एक्सएल 6 या दोन सात सीटर एमपीव्हीना टक्कर देणार आहे.
किया इंडियाने (Kia India) थेट मारुतीलाच टार्गेट करण्याचे ठरविले आहे. किया सेल्टॉसच्या विक्रमी विक्रीनंतर कंपनीने मारुतीच्या ब्रेझाला टक्कर देण्यासाठी किया सोनेट लाँच केली होती. आता कियाने मारुतीच्या एमपीव्ही सेगमेंटच्या बादशाहीलाच हात घालण्याचे ठरविले आहे. किया इंडिया पंधरा दिवसांनी बहुप्रतिक्षित सात सीटर एमपीव्ही जागतिक बाजारात आणणार आहे. 16 डिसेंबरला या कारवरून पडदा हटविण्यात येईल.
कियाच्या या सात सीटर कारचे नाव Kia Carens असे ठेवण्यात आले असून आज कंपनीने याचा टीझर लाँच केला आहे. Carens बाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरु होती. आता या कारची वाट पाहणाऱ्यांना जास्त वेळ वाट पहावी लागणार नाही.
Say Hi to Carens, an all-new Kia!
— Kia India (@KiaInd) December 1, 2021
An experience that inspires new beginnings, new ideas, new horizons.
The Kia Carens World Premiere - Join in on 16th Dec’21 @1200Hrs#KiaCarens#TheNextFromKia#MovementThatInspires
Click to set a reminder.
केव्हा होणार लाँच?
कंपनीने Kia Carens कधी लाँच होईल याची तारीख अद्याप सांगितलेली नाही. ही कार भारतीय बाजारात 2022 च्या सुरुवातीला लाँच केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये या कारची एन्ट्री भारतीय बाजारात होईल.
कियाची एमपीव्ही कॅटेगरीमध्ये पहिली कार असणार आहे. थर्ड रोचा अॅक्सेस एका बटनावर मिळणार आहे. कारमध्ये 7 सीटर लेआऊट, इलेक्ट्रीक सनरुफ, टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिमसारखी फिचर्स असणार आहेत.
कियाची ही नवी कार मारुती सुझुकीच्या अर्टिगा आणि एक्सएल 6 या दोन सात सीटर एमपीव्हीना टक्कर देणार आहे. सुझुकीने आंतरराष्ट्रीय बाजारात नुकतीच Suzuki Ertiga Sport FF लाँच केली आहे. ही कार भारतात येण्याची शक्यता आहे.