ब्रेझाला दमवले, आता अर्टिगाची बारी! Kia कडून एमपीव्ही लाँच करण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 02:00 PM2021-08-10T14:00:08+5:302021-08-10T14:01:39+5:30
Kia Motors 7 Seater MPV: किया मोटर्सने (Kia Motors) कमी काळात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने दोन वर्षांत 4 लाख कार विकल्या आहेत. याचा फटका मारुतीच्या ब्रेझाला जास्त बसला आहे.
भारतात 7 सीटर कारची मागणी वाढू लागली आहे. सध्या ग्राहकांमध्ये कॉम्पॅक्ट एसयुव्हीचा ट्रेंड आहे. परंतू अनेकांना हम दो हमारे दो सह घरातील अन्य सदस्य असल्याने कमी किंमतीतील सात सीटर एमपीव्हीकडे (7 Seater MPV) लोकांचा ओढा आहे. सध्या बाजारात स्वस्तातली रेनॉची ट्रायबर आणि मारुतीची अर्टिगा व एक्सएल6 उपलब्ध आहेत. याचबरोबर ह्युंदाई, टाटा, महिंद्रा आणि एमजी याकंपन्यांच्या थोड्या महागड्या कार देखील आहेत. याला टक्कर देण्यासाठी किया मोटर्सने मोठी तयारी केली आहे. (Kia KY 7 Seater MPV will Launch Against Maruti suzuki Ertiga)
15 दिवसांतच Skoda Kushaq मध्ये सापडले 4 प्रॉब्लेम; पुण्यातील मालक वैतागला
किया मोटर्सने (Kia Motors) कमी काळात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने दोन वर्षांत 4 लाख कार विकल्या आहेत. याचा फटका मारुतीच्या ब्रेझाला जास्त बसला आहे. आता किया अर्टिगाला टक्कर देण्य़ासाठी सज्ज होत असून 7 सीटर एमपीव्ही आणण्याच्या तयारीला लागली आहे.
नव्या Hero Electric Scooter चे फोटो लीक; ओला, बजाज चेतकला देणार टक्कर
Kia Sonet, Kia Seltos आणि Kia carnival या तीन कार सध्या कियाच्या ताफ्यात आहेत. यापैकी किया सेल्टॉसने तुफान सेल केला आहे. यामुळे पुढील वर्षी सुरुवातीला किया Kia KY ही एमपीव्ही लाँच करण्याची शक्यता आहे. या कारची किंमत ही Maruti Ertiga आणि Toyota Innova Crysta सारख्या कारच्या रेंजमध्ये असू शकते. याची किंमत 14 ते 20 लाख रुपये असू शकते. या कारचे फिचर्स कसे असतील यावर किंमतीचा अंदाज लावणे शक्य होणार आहे.
Video: आनंद महिंद्रांचा मोठा निर्णय! कंपनीची वर्षानुवर्षाची ओळख 'पुसणार'; लोगो बदलणार
Kia KY 7 Seater MPV ही कार किया सेल्टॉस म्हणजेच ह्युंदाई क्रेटाच्या प्लॅटफॉर्मवर बनविली जाईल. या कारमधील थर्ड रो हा इलेक्ट्रॉनिक बटनाद्वारे अॅडजस्ट होईल. या एमपीव्हीमध्ये सहा आणि सात सीटर ऑप्शन असेल. कियाच्या या एसयुव्हीमध्ये ह्युंदाईच्या Hyundai Stargazer 7 Seater MPV सारखे फिचर असतील. ह्युंदाईची ही कार पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल होणार आहे.
OMG! मारुती सुझुकी तगडी कार CNG मध्ये आणणार; Brezza चे डिटेल्स लीक