Kia SUV Fire: पार्किंगमध्ये उभ्या KIA च्या कारना आग लागण्याचा धोका; 4.4 लाख कार रिकॉल केल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 11:41 AM2021-05-19T11:41:08+5:302021-05-19T11:41:51+5:30
Kia SUV Fire issue in America: कियाच्या या एसयुव्हींमध्ये इंजिन बंद असेल तरी देखील आग लागण्याची शक्यता आहे. कंपनीने अमेरिकेतील कार मालकांना त्यांच्या कार उघड्यावर पार्क करण्याच्या सुचना केल्या आहेत.
दक्षिण कोरियाची दिग्गज वाहन निर्माता कंपनी किया मोटर्स (Kia moters) ने आपल्या 4.40 लाखांहून अधिक एसयुव्ही कार माघारी (Racall's Cars, SUV) बोलावल्या आहेत. या कारच्या इंजिनमध्ये (Engine fire) आग लागण्याची शक्यता असल्याने कियाने दुसऱ्यांदा अमेरिकी बाजारातून या कार रिकॉल केल्या आहेत. कंपनीने या कार मालकांना त्यांच्या कार उघड्यावर पार्क करण्याच्या सुचना केल्या आहेत. (Kia is recalling more than 440,000 cars and SUVs in the US market for a second time over a possible engine fire issue.)
कियाच्या या एसयुव्हींमध्ये इंजिन बंद असेल तरी देखील आग लागण्याची शक्यता आहे. या रिकॉलमध्ये 2013-2015 मध्ये बनलेल्या Optima (ऑप्टिमा) सेदान कार आणि 2014-2015 मध्ये बनलेल्या Sorento (सोरेंटो) एसयूव्ही सारख्या मॉडेल आहेत. ही वाहने परत बोलविण्याची कंपनीची ही दुसरी वेळ आहे. या आधी कंपनीने 2020 मध्ये या कार रिकॉल केल्या होत्या. या कारमधील ब्रेक फ्ल्युईड लीक होण्याची समस्या आली होती. तेव्हा या ब्रेक फ्युअडने कंट्रोल कॉम्प्युटरला नुकसान पोहोचविले होते. यामुळे शॉर्टसर्किट झाले होते. यामुळे गाडी पार्किगमध्ये उभी असूनही तिला आग लागण्याचा धोका वाढला होता.
कंपनीने काय म्हटले...
किया ने सांगितले की, डीलर मागे बोलविण्यात आलेल्या कारच्या कंट्रोल कॉम्प्युटरची तपासणी करतील. यानंतर नवीन फ्यूज लावतील. गरज वाटली तर ते बदलले जाईल. कंपनी या वाहन मालकांना दोन जुलैपासून रिकॉल नोटिफिकेशन पाठविणार आहे. नवीन फ्युज कमी अँम्पिअर रेटिंगचे असणार आहे. यामुळे आग लागण्याची शक्यता कमी होणार आहे.
प्रभावित मॉडेलमध्ये आतापर्यंत सहा कारना आग लागली आहे. यामध्ये चार ऑप्टिमा सेदान आणि दोन सोरेंटो एसयुव्ही आहेत. या वाहनांमध्ये वितळण्याची वेगवेगळी समस्या आली होती, असा दावा कंपनीने केला आहे. या आग लागण्याच्या घटनांमुळे कोणालाही इजा किंवा जिवितहानी झालेली नाही, असे कंपनीने म्हटले आहे.