सिंगल चार्जवर 600 KM ची रेंज, भारतात कधी लॉन्च होणार KIA ची नवीन EV कार? पाहा फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 07:05 PM2024-05-28T19:05:41+5:302024-05-28T19:05:51+5:30

Kia New Electric Car: फास्ट चार्जरच्या मदतीने अवघ्या 31 मिनिटांत बॅटरी चार्ज होणार.

Kia New Electric Car: 600 KM range on a single charge, when will KIA's new EV car be launched in India? Check out the features | सिंगल चार्जवर 600 KM ची रेंज, भारतात कधी लॉन्च होणार KIA ची नवीन EV कार? पाहा फीचर्स...

सिंगल चार्जवर 600 KM ची रेंज, भारतात कधी लॉन्च होणार KIA ची नवीन EV कार? पाहा फीचर्स...

Kia Electric Cars: काही वर्षांपूर्वी भारतात व्यवसाय सुरू करणाऱ्या Kia मोटर्सने आपला चांगला जम बसवला आहे. कंपनी सातत्याने आपल्या नव नवीन गाड्या लॉन्च करत आहे. आता कंपनीने आपल्या EV पोर्टफोलिओमध्ये आणखी एक गाडी आणली आहे. कंपनीने या नवीन EV3 चा टीझरदेखील जारी केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी कंपनीने EV9, EV6 आणि EV5 मॉडेल्सदेखील जागतिक बाजारात आणले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, E-GMP मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर तयार केलेली ही कार सिंगल चार्जवर 600 किमीची रेंज देईल. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही कार कोरियन बाजारात जुलै 2024 पर्यंत लॉन्च केली जाईल. यानंतर युरोप आणि पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत लॉन्च होईल. या कारची सुरुवातीची किंमत सुमारे 30 लाख रुपये असू शकते.

जाणून घ्या फीचर्स...
कंपनीने EV3 मध्ये हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटर बसवली आहे. ही मोटर 201 bhp पॉवर आणि 283 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही इतकी शक्तिशाली आहे की, अवघ्या 7.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. कारचा टॉप स्पीड 180 किमी प्रतितास आहे. EV3 जागतिक बाजारपेठेत 58.3kWh आणि 81.4kWh या दोन बॅटरी पॅकसह लॉन्च केली जाईल. मोठी बॅटरी 600 किमीची श्रेणी देईल अन् DC फास्ट चार्जरच्या मदतीने अवघ्या 31 मिनिटांत 80% पर्यंत बॅटरी चार्ज करू शकाल.

सुरक्षा फीचर्स 
Kia EV3 च्या सुरक्षेबद्दल बोलायचे झाल्यास, यात फॉरवर्ड कोलिजन अव्हॉयडन्स, लेन-कीप असिस्ट आणि मल्टिपल एअरबॅग्स, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि लेव्हल 2 ॲडव्हान्स्ड ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (ADAS) यांसारखी फीचर्स मिळतील. तसेच, ही कार व्हॉईस कमांडने चालू शकेल. ही कार भारतात लॉन्च झाल्यावर याची BYD Ato-3, मारुती EVX, MG ZS EV, Hyundai Creta EV आणि Tata Curve EV शी स्पर्धा करेल.

Web Title: Kia New Electric Car: 600 KM range on a single charge, when will KIA's new EV car be launched in India? Check out the features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.