Kia ने कारच्या किमती वाढवल्या; EV6, Carens, Sonet आणि Seltos खरेदी 1 लाखांपर्यंत महाग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 01:19 PM2023-01-06T13:19:21+5:302023-01-06T13:20:10+5:30
Kia Price Hike : तुम्हीही किया मोटर्स कार घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या कंपनीने कोणत्या कारची किंमत किती वाढवली आहे.
नवी दिल्ली : किया मोटर्सने (Kia Motors) नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच आपल्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. या वाढीनंतर आता ग्राहकांना कंपनीच्या कार खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये अधिक द्यावे लागतील. दरम्यान, तुम्हीही किया मोटर्स कार घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या कंपनीने कोणत्या कारची किंमत किती वाढवली आहे.
KIA EV 6 Price Hike
किया मोटर्सने ज्या मॉडेलची किंमत सर्वात जास्त वाढवली आहे, ते किया EV6 आहे, ज्याची GT Line आणि GT Line AWD टॉप मॉडेल्स 1 लाख रुपयांपर्यंत महाग झाली आहेत. किया EV6 ची किंमत 60.95 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते, जी टॉप-स्पेक मॉडेलसाठी 65.95 लाखांपर्यंत जाते.
KIA Seltos Price Hike
किया सेल्टोस एसयूव्ही आपल्या सेगमेंटमधील लोकप्रिय एसयूव्हीमध्ये गणना केली जाते, ज्यामध्ये कंपनीने 50,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत वाढवली आहे. या कारच्या डिझेल इंजिन व्हेरिएंटवर 50 हजार रुपयांची ही वाढ लागू होईल. कंपनीने किया सेल्टोसच्या पेट्रोल इंजिन व्हेरिएंटमध्ये 20,000 रुपयांनी वाढ केली आहे, तर त्याच्या टर्बो पेट्रोल इंजिन व्हेरिएंटच्या किंमतीत 40,000 रुपयांपेक्षा जास्त वाढ केली आहे. किया सेल्टोसची किंमत 10.69 लाख रुपयांपासून सुरू होते, जी टॉप मॉडेलसाठी 19.15 लाख रुपयांपर्यंत जाते. या किंमती एक्स-शोरूम दिल्लीमधील आहेत.
KIA Sonet Price Hike
किया सोनेट एसयूव्ही खरेदी करण्यासाठी ग्राहकाला 20 ते 40 हजार रुपये जास्त खर्च करावे लागतील. कंपनीने कियाच्या 1.5 लीटर नॅचरली एस्पिरेटेड व्हेरिएंटच्या किमतीत 20,000 रुपयांनी वाढ केली आहे. 1.0 लीटर टर्बो पेट्रोल व्हेरिएंटवर 25 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सोनट डिझेल वेरिएंटबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने त्याची किंमत 40,000 रुपयांनी वाढवली आहे.किया सोनेटच्या किमतीत वाढ झाल्यानंतर कारची किंमत 7.69 लाख रुपयांवरून 14.39 लाख रुपये करण्यात आली आहे.
Kia Carens Price hike
किया मोटर्सने आपल्या एकमेव एमपीव्ही किया कॅरेन्सची किंमत 20 रुपयांवरून 45 हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. किया कॅरेन्सचेन इंजिन व्हेरिएंट आहेत, ज्यामध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन व्हेरिएंटमध्ये 20 हजार रुपयांनी, 1.4 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये 25 हजार रुपयांची आणि डिझेल इंजिन व्हेरिएंटमध्ये 45 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. किमतीत वाढ झाल्यानंतर किया कॅरेन्सची नवीन सुरूवातीची किंमत 10.20 लाख रुपयांपासून ते 18.45 लाख रुपयांपर्यंत झाली आहे. ही किंमत दिल्लीतील एक्स-शोरूममधील आहे.