Kia Seltos: किया मारुतीच्या वाटेवर! सेल्टॉसबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, डिझेल व्हेरिअंट बंद करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 03:09 PM2022-02-02T15:09:51+5:302022-02-02T15:10:08+5:30

Kia Seltos News Facelift: Kia Seltos 2022 फेसलिफ्टचा लवकरच येणार आहे. यापूर्वीच कंपनीने हे पाऊल उचलल्यास त्याचा मोठा परिणाम भारतात होण्याची शक्यता आहे.

Kia Seltos diesel to be discontinued: Reports | Kia Seltos: किया मारुतीच्या वाटेवर! सेल्टॉसबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, डिझेल व्हेरिअंट बंद करणार

Kia Seltos: किया मारुतीच्या वाटेवर! सेल्टॉसबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, डिझेल व्हेरिअंट बंद करणार

Next

जेव्हा सगळीकडे ऑटो क्षेत्रात मंदी होती, तेव्हा कियासाठी मोठी संधी घेऊन आलेली सेल्टॉसबाबत कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ज्या कारने कियाला भारतात सोनेरी दिवस दाखविले तिचे डिझेल मॉडेलच कायमचे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा निर्णय भारतापुरताच नाही तर जागतिक स्तरावरील असणार असल्याचे सांगितले जात आहे 

मारुतीने डिझेल व्हेरिअंटच्या गाड्याच बनविणे बंद केले आहे. फोक्सवॅगन २०२५ पर्यंत बंद करणार आहे. पर्यावरणासाठी हा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. कियाचा देखील हाच रस्ता असण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, Kia या कारचे डिझेल वेरिएंट बंद करेल आणि पेट्रोल हायब्रिड व्हेरिअंट आणेल. हायब्रीड मॉडेलमध्ये कंपनी 1.6 लीटर पेट्रोल इंजिन वापरू शकते जे Kia Niro मध्ये देखील वापरले जाते. ही पॉवरट्रेन 137 bhp पॉवर आणि 264 Nm टॉर्क जनरेट करते.

Kia Seltos 2022 फेसलिफ्टचा लवकरच येणार आहे. यापूर्वीच कंपनीने हे पाऊल उचलल्यास त्याचा मोठा परिणाम भारतात होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत किया सेल्टॉस फेसलिफ्ट आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच केली जाणार आहे. कंपनी या कारच्या डिझाइनमध्ये काही बदल देखील करू शकते. सेल्टॉस फेसलिफ्टमध्ये एक सुधारित फ्रंट ग्रिल, नवीन अलॉय व्हील्स आणि सुधारित बंपर देखील मिळतील. याशिवाय केबिनमध्येही काही बदल अपेक्षित आहेत.

Web Title: Kia Seltos diesel to be discontinued: Reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.