Creta अब तेरा क्या होगा? लवकरच येतेय जबरदस्त SUV, इंजिन अन् फीचर्सच्या जोरावर घालणार धुमाकूळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 05:50 PM2023-02-15T17:50:27+5:302023-02-15T17:50:51+5:30
साधारणपणे ही फेसलिफ्ट याच वर्षात एप्रिल महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते...
भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Hyundai Creta आणि Kia Seltos यांच्यात जबरदस्त चुरस दिसून आली आहे. पण ह्युंदाई क्रेटा ही विक्रीच्या बाबतीत आघाडीवर, तर सेल्टॉस हिच्या बरोबर मागे अर्थात दुसऱ्या क्रमांकावर आहे. खरे तर, दोन्ही कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च होणे निश्चित आहे. किआ सेल्टॉसचे फेसलिफ्ट मॉडेल आधी लॉन्च केले जाऊ शकते. जे सध्याच्या ह्युंदाई क्रेटात उपलब्ध नसलेले फीचर्स देऊन विक्रीत फायदा देऊ शकते. थोडक्यात काय तर, सेल्टॉस फेसलिफ्ट आल्यानंतर क्रेटाची अडचण वाढू शकते.
साधारणपणे किआ सेल्टॉस फेसलिफ्ट याच वर्षात एप्रिल महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते. तर ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टचे लॉन्चिंग पुढील वर्षापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, किआ सेल्टॉसच्या फेसलिफ्ट मॉडेलची आधीपासूनच अमेरिका आणि दक्षिण कोरियात विक्री होत आहे. मात्र ते भारतात आणण्यापूर्वी त्यात काही बदल केला जाईल.
या नव्या किआ सेल्टॉसमध्ये एलईडी हेडलॅम्प्ससोबतच टायगर नोज फ्रंट ग्रिल, सिग्नेचर लायटिंग, डीआरएलसह इंटीग्रेटेड व्हर्टिकल शेप्ड फॉग लॅप्स आणि रिव्हाइज्ड फ्रंट बम्पर असेल. रिअर प्रोफाइलमध्ये एक नवे बम्पर आणि मॉडिफाईड एलईडी टेल-लॅम्प देखील असेल.
किआ सेल्टॉस फेसलिफ्टमध्ये 10.25 इंचाचे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्लेसह 10.25 इंचाचे इंफोटेनमेंट सिस्टिम, ऑटो एसी, रिअर एसी व्हेंट, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि इलेक्ट्रिक पॅनोरामिक सनरूफ देण्यात येईल. या कारमध्ये ADAS देखील दिले जाऊ शकते. हे एक मोठे अपडेट असेल. किआ सेल्टॉस फेसलिफ्टच्या सेफ्टी सूटमध्ये अडेप्टिव्ह क्रूज कंट्रोल, फॉरवर्ड कोलिशन-अव्हॉयडन्स सिस्टिम, ब्लाइंड स्पॉट कोलिजन-अव्हॉयडन्स असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि ऑटोमॅटिक इमरजन्सी ब्रेकिंगची सुविधाही असेल.
Kia Seltos फेसलिफ्टमध्ये नवे 1.5-लिटर चार-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनही येऊ शकते. जे 158 bhp मॅक्स पॉवर आणि 260 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड डीसीटी गिअरबॉक्स असे पर्यायही देले जातील. किआ सेल्टॉस फेसलिफ्टसाठी इतर पॉवरट्रेन पर्याय 1.5-लिटर एनए पेट्रोल (115 बीएचपी) आणि 1.5-लिटर डिझेल (115 बीएचपी) असेल.