Kia India: कियाचा 'तहलका'! थोडं थांबा; Kia Seltos, Sonet चे नवे फेसलिफ्ट पुढील महिन्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 01:37 PM2021-04-27T13:37:38+5:302021-04-27T13:39:49+5:30

NewKia: कियाने दोन वर्षांपूर्वी भारतीय बाजारात पाऊल ठेवले होते. मंदी असुनही कियाने सेल्टॉसच्या मदतीने भारतीय बाजारपेठेत तहलका केला होता. यानंतर कंपनीने कोरोना काळात म्हणजेच गेल्या वर्षी सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही किया सोनेट लाँच केली होती.

Kia Seltos, Sonet's new facelift 2021 will come next month; also change name and logo | Kia India: कियाचा 'तहलका'! थोडं थांबा; Kia Seltos, Sonet चे नवे फेसलिफ्ट पुढील महिन्यात येणार

Kia India: कियाचा 'तहलका'! थोडं थांबा; Kia Seltos, Sonet चे नवे फेसलिफ्ट पुढील महिन्यात येणार

googlenewsNext

2021 Kia Seltos & Sonet Launch Update: फार कमी कालावधीत भारतात पाय रोवणारी दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी कियाने आज मोठी घोषणा केली आहे. किया मोटर्स इंडिया (Kia Motors India) या नावातून मोटर्स काढून टाकत भारतातील कंपनीचे नवे नाव किया इंडिया (Kia India) ठेवले आहे. याचबरोबर २०२६ पर्यंत कंपनी एका मागोमाग एक अशा ११ ईव्ही लाँच करणार आहे. हे काहीच नाही, कंपनीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. (Kia Motors Indi will now be known as Kia India. Kia will launch Seltos and sonet Facelift versions in next month.)


कियाने दोन वर्षांपूर्वी भारतीय बाजारात पाऊल ठेवले होते. मंदी असुनही कियाने सेल्टॉसच्या मदतीने भारतीय बाजारपेठेत तहलका केला होता. यानंतर कंपनीने कोरोना काळात म्हणजेच गेल्या वर्षी सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही किया सोनेट लाँच केली होती. आज कंपनीने नवीन लोगो लाँच केला असून भारतात आणखी तीन कार लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. 

Ather EV Scooter: एथर जोमात! मुंबईत उभारली १० चार्जिंग स्टेशन, कारही चार्ज करा; पहा लोकेशन...


कंपनीच्या एकूण विक्रीचा ९० टक्के वाटा हा किया सोनेट आणि किया सेल्टॉसचा आहे. यामुळे कंपनी पुढील महिन्यात या दोन्ही कारचे फेसलिफ्ट लाँच करणार आहे. या नव्या मॉडेलमध्ये डिझाईन आणि तंत्रज्ञान अपडेट केले जाण्याची शक्यता आहे. तसेच किया भारतात आपले नेटवर्क विस्तारणार आहे. ३५० टच पॉईंट आणि देशभरात २०० हून अधिक शहरांमध्ये सेल्स आणि सर्व्हिस सेंटर उघडले जाणार आहेत. तसेच जगभरात कंपनी पुढील पाच वर्षांत ११ इलेक्ट्रीक कार लाँच करणार आहे. यामध्ये सात वाहने ही पूर्णपणे नवीन असणार आहेत. 


महत्वाचे म्हणजे किया ही कंपनी दोन वर्षांपूर्वी भारतात आलेली असली तरीही ती भारतातील विक्रीतील चौथी मोठी कंपनी बनली आहे. कियाने आतापर्यंत 2,50,000 कार विकल्या आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार कंपनी प्रत्येक दोन मिनिटाला एक कार विकते. 
 

Web Title: Kia Seltos, Sonet's new facelift 2021 will come next month; also change name and logo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.