लवकर लाँच होणार Kia Sonet Facelift; जाणून घ्या 'या' कारमध्ये काय फीचर्स असतील?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 03:30 PM2023-09-27T15:30:25+5:302023-09-27T15:31:29+5:30
याव्यतिरिक्त, नवीन 16-इंच अलॉय व्हील देखील नवीन डिझाइनसह दिसतील. मात्र, कारच्या मागील बाजूस स्टाइलिंगमध्ये फारसा बदल होणार नाही.
नवी दिल्ली : किआ (Kia) लवकरच काही कॉस्मिक बदलांसह आपले सोनेट फेसलिफ्ट लाँच करणार आहे. ज्यामध्ये अपडेटेड ग्रिल डिझाइन आणि नवीन हेडलॅम्प सेट-अपमुळे सोनेटला नवीन लुकसह बदललेला फ्रंट एंड मिळेल. फ्रंट बंपर देखील नवीन लुकसह अपडेट करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, नवीन 16-इंच अलॉय व्हील देखील नवीन डिझाइनसह दिसतील. मात्र, कारच्या मागील बाजूस स्टाइलिंगमध्ये फारसा बदल होणार नाही.
नवीन किआमध्ये काही नवीन कलर देखील समाविष्ट केले जाऊ शकतात. तसेच, केबिनमधील ड्युअल टोन अपहोल्स्ट्रीसह नवीन इंटिरिअर कलरसोबत बदलला जाईल. डिझाईननुसार, सेंटर कन्सोलला वेगळ्या क्लायमेट कंट्रोल स्क्रीनसह नवीन रूप मिळते. तसेच, टॉगल स्विचसह बटणाचा लेआउट बदलला आहे. मात्र, त्याचे मूळ डिझाइन लेआउट समान राहते. इतर गोष्टींबरोबरच, स्टीयरिंग व्हीलवर आढळलेल्या नियंत्रणांच्या डिझाइनमध्ये बदल देखील पाहिले जाऊ शकतात.
याचबरोबर, इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्येही बदल दिसून येतील आणि ते व्हेन्यू फेसलिफ्ट सारखे डिजिटल युनिट असणार आहे. पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, सोनेट सध्याच्या 1.2 पेट्रोल आणि 1.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 डिझेल इंजिनसह ठेवली जाईल. दरम्यान, iMT क्लचलेस मॅन्युअल आहे, तसाच ठेवला जाण्याची शक्यता आहे. तर टर्बो पेट्रोल पॅडल शिफ्टर्ससह डीसीटी स्वयंचलित देखील उपलब्ध असतील. डिझेलमध्येही iMT पूर्वीप्रमाणेच कायम राहील.
कोणाला देणार टक्कर?
या सेगमेंटमध्ये नवीन टाटा नेक्सॉन आणि नवीन ह्युंदाई व्हेन्यू लाँच करण्यात आली आहे, ज्या दोन्ही लोकप्रिय SUV आहेत. याला टक्कर देण्यासाठी सोनेटमध्ये काही बदल केले जाणार आहेत. नवीन किआ सोनेट फेसलिफ्ट पुढील वर्षाच्या सुरुवातीला लाँच होईल अशी शक्यता आहे. तसेच, कारमध्ये करण्यात येणाऱ्या बदलांमुळे किमतीत थोडी वाढ होऊ शकते.