कियाचा मोठा निर्णय! Seltos, Sonet आणि Carens च्या ग्राहकांना एकच चावी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 03:59 PM2022-06-12T15:59:37+5:302022-06-12T15:59:54+5:30

एक सापडत नसली तर दुसऱ्या चावीने गाडी सुरु करता येते. शिवाय गाडीची चोरी झाली तर विमा मिळवून देणारी ती दुसरीच चावी कामी येते. परंतू कियाने मोठा निर्णय घेतला आहे. 

Kia's big decision! Customers of Seltos, Sonet and Carens will get a single key, second key will get after octomber | कियाचा मोठा निर्णय! Seltos, Sonet आणि Carens च्या ग्राहकांना एकच चावी मिळणार

कियाचा मोठा निर्णय! Seltos, Sonet आणि Carens च्या ग्राहकांना एकच चावी मिळणार

Next

कार किंवा स्कूटरच्या दोन चाव्या किती उपयोगाच्या असतात हे अनेकांना माहिती आहे. एक सापडत नसली तर दुसऱ्या चावीने गाडी सुरु करता येते. शिवाय गाडीची चोरी झाली तर विमा मिळवून देणारी ती दुसरीच चावी कामी येते. परंतू कियाने मोठा निर्णय घेतला आहे. 

किया यापुढे काही दिवस, महिने जेवढ्या गाड्या बनवेल त्यांची एकच चावी ग्राहकांना देणार आहे. दुसऱ्या चावीसाठी ग्राहकांना वेटिंगवर रहावे लागणार आहे. सेमीकंडक्टरच्या टंचाईमुळे मोठमोठ्या कंपन्यांची हालत बेकार झाली आहे. पूर्वीपेक्षा हा वेटिंग पिरिएड कमी झालेला असला तरी कंपन्यांना ती चीप मिळविणे कठीण बनत चालले आहे. यामुळे कियाने आपल्या ग्राहकांना यापुढे एकच चावी देण्याच निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक चावीसाठी सेमिकंडक्टरची गरज असते. परंतू, तेवढे ते मिळत नसल्याने ग्राहकांना कारसोबत एकच चावी दिली जाणार आहे. दुसरी चावी काही दिवसांनी मिळेल परंतू त्याची वेळ सांगण्यात आलेली नाही. 

कंपन्यांना विक्रीच्या समस्येने त्रासले आहे. यामुळे कियाने जेवढे सेमीकंडक्टर वाचतील तेवढे जास्त उत्पादन घेता येईल म्हणून हा निर्णय घेतला आहे. काही कंपन्यांनी चिपच्या कमतरतेमुळे कारमधील फिचर्स, क्रिएचर कंफर्ट आदी कमी करण्यास सुरुवात केली आहे. टाटा मोटर्सने आपल्या कारमध्ये ही कपात केली आहे. तर कियाची सहकारी कंपनी ह्युंदाईने देखील आपल्या ग्राहकांना एक चावी देण्यास सुरुवात केली आहे. 

Kia सध्या भारतात सोनेट, सेल्टोस, कार्निव्हल, कॅरेन्स आणि EV6 या कार विकते. या सर्व कार 2 स्मार्ट की सह येतात ज्या ग्राहकांना कीलेस एंट्री, टेलिमॅटिक्स आणि बरेच काही यांसारखी वैशिष्ट्ये देतात. या कीसाठी सेमिकंडक्टरची गरज असते. आजपासून, सर्व Kia कार ग्राहकांना एकच चावी दिली जाईल. दुसरी चावी ऑक्टोबरमध्ये दिली जाईल. डीलर ही चावी ग्राहकांच्या कारशी क़ॉन्फिगर करतील. हे कार मालकाच्या घरी किंवा डीलरकडे केली जाऊ शकते. 

Web Title: Kia's big decision! Customers of Seltos, Sonet and Carens will get a single key, second key will get after octomber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.