कमी किमतीची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; सिंगल चार्जवर 120KM रेंज, स्पीड सुद्धा जबरदस्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 04:57 PM2022-09-07T16:57:41+5:302022-09-07T16:58:36+5:30

Kinetic Green Zing e-scooter : कंपनीने नवीन स्कूटरची किंमत 85 हजार रुपये ठेवली आहे. कंपनीचा दावा आहे की, स्कूटर पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 125 किमी रेंज देईल.

Kinetic Green Zing e-scooter with 60km top speed and 125km range launched at Rs 85,000 | कमी किमतीची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; सिंगल चार्जवर 120KM रेंज, स्पीड सुद्धा जबरदस्त!

कमी किमतीची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; सिंगल चार्जवर 120KM रेंज, स्पीड सुद्धा जबरदस्त!

Next

नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर  (electric scooter) लाँच करण्यात आली आहे. कायनेटिक ग्रीन एनर्जीने (kinetic green energy) ही स्कूटर लाँच केली आहे. Zing HSS नावाची ही हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनी आधीच या नावाची स्कूटर विकत आहे, परंतु त्याचा वेग कमी होता. कंपनीने नवीन स्कूटरची किंमत 85 हजार रुपये ठेवली आहे. कंपनीचा दावा आहे की, स्कूटर पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 125 किमी रेंज देईल.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.4 KwH ची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. पूर्ण चार्ज होण्यासाठी 3 तास लागतात. या स्कूटरला नॉर्मल, पॉवर आणि इको असे तीन ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहे. स्कूटरला 3 स्टेप अॅडजस्टेबल सस्पेंशन आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये क्रूझ कंट्रोल, मल्टी-फंक्शनल डॅशबोर्ड, यूएसबी पोर्ट, डिटेचेबल बॅटरी आणि एक स्मार्ट रिमोट की मिळते. तसेच, कंपनी कायनेटिक ग्रीन झिंग स्कूटरवर 3 वर्षांची वॉरंटी देत ​​आहे.

स्कूटरला डिजिटल डिस्प्ले मिळतो, ज्यामध्ये स्पीडसह ट्रिप आणि उर्वरित बॅटरी पाहता येतो. फोन चार्जिंगच्या सुविधेसाठी यामध्ये यूएसबी पोर्ट उपलब्ध आहे. कायनेटिक झिंग एचएसएस रिमोट कीजसह येते, ज्यामध्ये अँटी-थेफ्ट अलार्म, कीलेस एंट्री, फाइंड स्कूटर अलर्ट शोधा आणि लॉक/अनलॉक बटण देण्यात आले आहे. दरम्यान, कंपनीचे म्हणणे आहे की, इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर सेगमेंटमध्ये यश मिळाल्यानंतर आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर्ससह मास मार्केट सेगमेंटला आकर्षित करण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीने 2021 मध्ये 2 मॉडेल लाँच केले आहेत आणि आतापर्यंत 40,000 हून अधिक स्कूटर विकल्या आहेत.

Web Title: Kinetic Green Zing e-scooter with 60km top speed and 125km range launched at Rs 85,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.